भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे ती ‘द हंड्रेड’ स्पर्धेत आपल्या बॅटने शानदार कामगिरी करत आहे. सध्या, विराट कोहली अँड कंपनी देखील लंडनमध्ये आहे, जिथे ते यजमान इंग्लंडसह ५ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळत आहेत.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (१२ ऑगस्ट) ब्रेक दरम्यान जेमिमाह इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बुचरसोबत गिटार वाजवताना दिसली. जेमिमाने तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर गिटार सेशनचा व्हिडिओ अपलोड केला. या दरम्यान जेमिमाह यांनी बुचरची स्तुती केली आहे.
जेमिमाहची ही शैली चाहत्यांना खूप आवडते
जेमिमाहने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘दिल चाहता हैं’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील ‘कोई कहे, कहता रहे, कितना भी हमको दिवाना …’ हे प्रसिद्ध गाणे गात आहे. जेमिमाहचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे चाहते वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जेमिमाहची ही शैली लोकांना खूप आवडत आहे.
जेमिमाह नेहमी तिच्याजवळ गिटार ठेवते
जेमिमाह २० वर्षांची असून, ती नेहमी तिच्यासोबत गिटार ठेवते. ती म्हणते की, ती प्रवास करताना आपली सुटकेस सोडू शकते. पण, ती गिटारशिवाय जगू शकत नाही. जेमिमाह गेली ३-४ वर्षे गिटार वाजवत आहे.
जेमिमाह रॉड्रिग्स
जेमिमाह द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळत आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा आतापर्यंत उत्तम राहिली आहे. सध्या जेमिमाह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने ५ सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने २४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान, तिने आत्तापर्यंत ३ अर्धशतके देखील केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध सामना म्हटलं की रुटची जबरदस्त कामगिरी ठरलेलीच! आकडे पाहून बसेल विश्वास
वाह रे पठ्ठ्या! जोस बटलरची विकेट घेताच ईशांत शर्माचा कुंबळ, कपिल देव यांच्या पंक्तीत समावेश
‘स्वत:च्या खेळाकडे आधी लक्ष दे’, विराटबद्दल ‘ते’ ट्वीट करताच रियान परागला चाहत्यांनी सुनावले