मंगळवारी (दि. 14 फेब्रुवारी) आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी20 रँकिंग समोर आली. यामध्ये फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाच्या रणरागिणी जेमिमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांना फायदा झाला. विशेष म्हणजे, पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना ही पहिल्या पाचमध्ये आहे.
आयसीसी महिला टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंग (ICC Women T20I Ranking) समोर येताच फलंदाजांच्या यादीत भारतीय खेळाडू चमकल्याचे पाहायला मिळाले. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि ऋचा घोष (Richa Ghosh) यांना फलंदाजांच्या यादीत फायदा होत अनुक्रमे 11व्या आणि 36व्या स्थानी पोहोचल्या आहेत.
High-ranking batters and all-rounders dominate 🔥
Which #T20WorldCup stars had the biggest paydays in the inaugural WPL Auction? https://t.co/qIrNOonvqq
— ICC (@ICC) February 14, 2023
महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जेमिमा आणि ऋचाची जोडी रँकिंगमध्ये सुधारणा करण्यात यशस्वी झाल्या. जेमिमाने नाबाद 52 धावांची खेळी करत 13व्या स्थानावरून 11वे स्थान गाठले. तसेच, ऋचा 31 धावांच्या नाबाद खेळीनंतर 42व्या स्थानावरून 36व्या स्थानावर पोहोचली.
पहिल्या दहात स्म्रीती मंधाना अव्वल भारतीय
बोटाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर असलेली उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) ही फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानासह अव्वल भारतीय खेळाडू आहे. स्म्रीतीची सलामी जोडीदार शफाली वर्मा (Shafali Verma) या यादीत 10व्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानसाठी या सामन्यात नाबाद 68 धावांची खेळी साकारणारी कर्णधार बिस्माह मारूफ 3 स्थानांचा फायदा घेत 8व्या स्थानी पोहोचली आहे.
गोलंदाजी रँकिंगमध्ये इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नॉनकुलुलेको म्लाबा यांनी अव्वल दोन स्थानावर आपली जागा आणखी मजबूत केली आहे.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात सहा विकेट्सह एक्लेस्टोन स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तिच्या नावावर 776 गुण आहेत. तसेच, म्लाबा 17 गुण मिळवत 770 गुणांसह अव्वलस्थानी पोहोचली आहे.
महिला प्रीमिअर लीगमध्ये चमकल्या भारतीय खेळाडू
भारतीय संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) ही महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्याच लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला 3.60 कोटींच्या मोठ्या रकमेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात घेतले. तिच्याव्यतिरिक्त जेमिमाला दिल्ली कॅपिटल्स संघाने 2.20 कोटींच्या बोलीसह संघात सामील केले. तसेच, रिचा घोषला आरसीबीने 1.90 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले, तर शफालीला दिल्लीने 2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले. (cricketer jemimah rodrigues and richa ghosh move up in icc t20i rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगभरात कोट्यवधी चाहते असणारा शाहरुख बनला विराट-जडेजाचा फॅन; म्हणाला, ‘मलाही शिकायचंय…’
माजी प्रशिक्षकाचा सचिनवर गंभीर आरोप! म्हणाले, ‘मी संघ जॉईन केल्यानंतर सचिन…’