बॉलिवूड आणि क्रिकेटचं अनोखं नातं आहे. सोशल मीडियामुळे तर क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांना आणखीच जवळ आणले आहे. अनेकदा क्रिकेटपटू आणि अभिनेते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. तसेच, एकमेकांविषयी चाहत्यांसोबत काही गोष्टीही शेअर करतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मात्र, तो भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा चाहता बनला आहे. स्वत: शाहरुखने या दोघांचे कौतुक करत त्यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचे भाष्य केले आहे. अशात शाहरुखचे ट्वीट भन्नाट व्हायरल होत आहे.
विराट आणि जडेजाचा डान्स व्हिडिओ
खरं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत विराट कोहली आणि रवींद्र जडेजा (Virat Kohli And Ravindra Jadeja) हे शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ सिनेमातील एका गाण्यावर डान्स करत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाहरुखने शेअर केला व्हिडिओ
शाहरुख खान याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांचाही व्हिडिओ शेअर केला आहे. खरं तर, एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत शाहरुखला विराट आणि जडेजाच्या डान्सविषयी विचारले होते. यावर शाहरुखने प्रत्युत्तर देत कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट आणि जडेजा माझ्यापेक्षा चांगला डान्स करत आहेत. मला त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.” शाहरुखचे हे ट्वीट आता जोरात व्हायरल होत आहे.
खरं तर, शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. पठाणने जगभरात 950 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. तसेच, या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
https://twitter.com/Trend_VKohli/status/1624617880208957447
पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दमदार विजय
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांच्या मोठ्या फरकाने धूळ चारत विजय साकारला होता. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (superstar shahrukh khan praised dance of virat kohli and ravindra jadeja see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माजी प्रशिक्षकाचा सचिनवर गंभीर आरोप! म्हणाले, ‘मी संघ जॉईन केल्यानंतर सचिन…’
महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार; ‘या’ दिग्गज खेळाडूने थेट सोशल मीडियावर मांडले दु:ख






