जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन याची गणना होते. विलियम्सन मागील काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2023 हंगामाच्या पहिल्याच सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला आयपीएल सोडून मायदेशी परतावे लागले होते. यानंतर विलियम्सनच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती आणि आता तो या दुखापतीतून सावरत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओत विलियम्सन मुलीसोबत घरातच क्रिकेट खेळताना दिसत आहे.
खरं तर, मंगळवारी (दि. 04 जुलै) कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विलियम्सन लेकीसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत आहे. व्हिडिओत दिसते की, विलियम्सन आधीपेक्षा खूप फिट दिसत आहे. विलियम्सन त्याच्या मुलीच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत विलियम्सन याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पहिला प्रतिस्पर्धी सामना परतला. बॅट पुन्हा हातात पकडून चांगले वाटले.”
https://www.instagram.com/reel/CuROl9TgHr_/
विलियम्सनच्या या पोस्टवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज, 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि 1 हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “विश्वचषकाचा सराव.” दुसऱ्या एका युजरने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्यावर निशाणा साधत लिहिले की, “आता तरी लाज वाटू दे बुमराह.” आणखी एकाने लिहिले की, “तुला विश्वचषकात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
अनुभवी फलंदाज विलियम्सनला अद्याप बरे होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत त्याच्या खेळण्याची शक्यता जवळपास नाहीये. खरं तर, स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. (cricketer kane williamson plays cricket with his daughter at home cute video goes viral)
महत्वाच्या बातम्या-
अब आयेगा मजा! 1 स्थानासाठी भिडणार नेदरलँड-स्कॉटलंड, कुणाला आणि कसे मिळणार विश्वचषकाचे तिकीट? वाचा
@100 Test: शंभराव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निवडली स्मिथची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी, घ्या जाणून