---Advertisement---

आठव्या सामन्यात कॉमेंटेटर, दहाव्या सामन्यात खेळाडू; RCBकडून 38 वर्षीय केदारला कमबॅकची संधी

On: शनिवार, मे 6, 2023 8:22 PM
Kedar-Jadhav
---Advertisement---

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू केदार जाधव हा आयपीएल 2023 स्पर्धेत समालोचन करताना दिसत होता. मात्र, आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली आहे. होय, केदार जाधवचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात केदार जाधव हा बेंगलोर संघाकडून मैदानात उतरला.

दोन वर्षांनंतर पुनरागमन
खरं तर, केदार जाधव (Kedar Jadhav) हा 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धेत उतरला आहे. त्याने त्याचा शेवटचा आयपीएल सामना 2021मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पंजाब किंग्सविरुद्ध खेळला होता. आरसीबी संघाचा खेळाडू डेविड विली आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे केदार जाधवला ही संधी मिळाली. बेंगलोरने केदारला त्याच्या 1 कोटींच्या मूळ किंमतीत ताफ्यात सामील केले.

आयपीएल 2023मध्ये खेळण्याबाबत केदार जाधव म्हणाला की, त्याला या हंगामात खेळण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फोन करून सुखद धक्का दिला होता.

आयपीएल 2023मध्ये समालोचन करत होता केदार
आयपीएल 2023मध्ये आतापर्यंत केदार जाधव हा समालोचन करत होता. मात्र, आता तो आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, आरसीबीच्या आठव्या सामन्यात केदार समालोचन करत होता, पण आता आरसीबीच्या दहाव्या सामन्यात केदार थेट मैदानात खेळत आहे.

महत्त्वाची बाब अशी की, यापूर्वीही केदार जाधव आरसीबी (Kedar Jadhav RCB) संघाकडून 17 सामने खेळला आहे. त्याने सांगितले की, तो त्याच्या फिटनेसची संपूर्ण काळजी घेतो. त्यामुळे त्याला RCBने त्यांच्या ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1654373107442806784?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1654373107442806784%7Ctwgr%5Ed358617d4527de9b5451e23de36576e9622e4c6e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagranjosh.com%2Fcurrent-affairs%2Fkl-rahul-rules-himself-out-of-remainder-of-ipl-2023-1683291843-2

केदार जाधवचे वय सध्या 38 वर्षे असून त्याने रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून शानदार फलंदाजी करताना 283 धावा चोपल्या होत्या. केदारच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 93 सामन्यात 1196 धावा केल्या आहेत. त्याने 2010मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे.

आरसीबीची हंगामातील कामगिरी
आरसीबी संघाने आयपीएल 2023मध्ये आतापर्यंत 9 सामने खेळून 5 सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत आरसीबी संघ पाचव्या स्थानी आहे. तसेच, दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ सलग 5 सामने गमावल्यानंतर स्थितीत सुधारणा केली. दिल्लीने या हंगामातील मागील 4 सामन्यात 3 विजय आणि 1 पराभवाचा सामना केला आहे. (cricketer kedar jadhav comeback in ipl 2023 playing for rcb)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजधानीत टॉस जिंकत बेंगलोरचा फलंदाजाची निर्णय, संघात केदार जाधवची एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन
13 वर्षानंतर चेपाॅकवर मुंबईचा पराभव, विजयासह चेन्नई गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---