---Advertisement---

केदार जाधवचं नशीब फळफळलं! ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी ताफ्यात झाला सामील

On: गुरूवार, जुलै 13, 2023 9:38 AM
Kedar-Jadhav
---Advertisement---

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिकांचा समावेश आहे. दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने झाली आहे. दुसरीकडे, भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट झोन आणि साऊथ झोन संघांनी स्थान मिळवले आहे. या सामन्यालाही 12 जुलैपासूनच सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठी वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघात भारतीय खेळाडू केदार जाधव याची अचानक एन्ट्री झाली आहे.

दुलीप ट्रॉफी 2023 (Duleep Trophy 2023) अंतिम सामन्यापूर्वी वेस्ट झोन (West Zone) संघाचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या युवराज सिंह डोडिया (Yuvraj Sinh Dodiya) दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे. खरं तर, अंतिम सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त होऊन युवराज संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी केदार जाधव (Kedar Jadhav) याला सामील करण्यात आले आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघात केदारचा समावेश
युवराज सिंग डोडिया भारतीय संघाचा उदयोन्मुख खेळाडू आहे. मात्र, तो सध्या दुखापतग्रस्त झाला आहे, त्यामुळे त्याला दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडावे लागले. खरं तर, युवराज सिंग डोडिया दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेत वेस्ट झोन संघाचा भाग होता. मात्र, आता दुखापतग्रस्त झाल्याने तो संघातून बाहेर पडला आहे. तो बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू केदार जाधव याला संघात सामील करण्यात आले आहे. दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघात संधी मिळाल्यानंतर केदारच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इमर्जिंग एशिया चषकासाठी भारतीय अ संघात युवराज सामील
इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेची सुरुवात 13 जुलैपासून झाली. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकाकडे आहे. इमर्जिंग आशिया चषक 2023चा अंतिम सामना 23 जुलै रोजी खेळला जाईल. तसेच, या स्पर्धेत युवराज सिंग डोडिया याला भारत अ संघात सामील करण्यात आले आहे. त्यामुळे आता संघाची इच्छा असेल की, त्याने लवकरात लवकर बरे व्हावे. (Cricketer Kedar Jadhav joins West Zone team for Duleep Trophy know here)

महत्वाच्या बातम्या-
बापानंतर लेकाला आऊट करून अश्विनने घडवला इतिहास, बनला ‘असा’ पराक्रम करणारा पहिला-वहिला भारतीय गोलंदाज
विंडीजविरुद्ध अश्विनची सिंहगर्जना! 5 विकेट्ससह अँडरसनला पछाडत बनला ‘असा’ कारनामा करणारा टॉपर सक्रिय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---