Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘दोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळायची गरज नाही…’, धिम्या फलंदाजीवर राहुलने सोडले मौन; टीकाकारांनाही झापले

'दोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळायची गरज नाही...', धिम्या फलंदाजीवर राहुलने सोडले मौन; टीकाकारांनाही झापले

March 8, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
KL-Rahul

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये प्रतिभा ठासून भरली आहे. मात्र, तेच खेळाडू आता 50 धावा करण्यासाठीही संघर्ष करताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये सलामीवीर केएल राहुल याच्या नावाचाही समावेश होतो. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघर्ष करत आहे. त्याला उपकर्णधारपदही गमवावे लागले आहे. टी20 क्रिकेटमध्ये तो संघातून बाहेर आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारातही त्याला धावा करता आल्या नाहीत आणि तो वादळी फलंदाजीही करू शकत नव्हता. याविषयी राहुलाल विचारणा केली असता, त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

नुकतीच, इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेसाठी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली. यावेळी केएल राहुल (KL Rahul) याने टी20 क्रिकेटमधील त्याच्या घसरत चाललेल्या स्ट्राईक रेटविषयीच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला की, “मला वाटते की, स्ट्राईक रेटसारख्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत. हे फक्त परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुम्ही 140 धावांचा पाठलाग करत आहात, तर तुम्हाला 200च्या स्ट्राईक रेटने धावा करण्याची गरज नाहीये.”

सातत्याने घसरत चाललाय स्ट्राईक रेट
एकूण आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये राहुलचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. मात्र, अलीकडच्या काही सामन्यांमध्ये तो वेगाने धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 139.12च्या स्ट्राईक रेटने 2265 धावा केल्या आहेत. 2016मध्ये पदार्पण करण्यापासून सन 2020पर्यंत त्याचा स्ट्राईक रेट प्रत्येक वर्षी 140 ते 160दरम्यान राहिला. मात्र, 2021मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 130वर आला आहे. मागील वर्षा यामध्ये आणखी घसरण झाली आणि तो आता 126वर आला आहे.

आयपीएलमध्ये लखनऊचा आहे कर्णधार
केएल राहुल हा आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्याने मागील हंगामात आपल्या संघाला प्लेऑफपर्यंत नेण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याने शानदार नेतृत्वासोबतच दमदार फलंदाजीही केली होती. मात्र, आयपीएलनंतर जसा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, तशी त्याला लय गवसली नाहीये. अशात तो आगामी काळात कशी कामगिरी करतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer kl rahul reaction on his low strike rate in recent t20s ahead of ipl 2023 in lsg new jersey launch event)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’
‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल


Next Post
sachin-tendulkar

स्त्रीशक्तीचा जागर करत सचिन म्हणतोय, 'बाईपण भारी देवा'! महिला दिनी थेट मराठीतून ट्विट

Photo Courtesy: Twitter

मुंबई इंडियन्सच्या 'बिग बॉय'ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ

Rohit Sharma

टीम इंडियाला 'ओव्हर कॉन्फिडन्ट' म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143