आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे, तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू के एल राहुल याने आयपीएल सुरू होण्याआधी उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. येथे त्याने चांदी दरवाजा पासून ईश्वर महादेव यांची पूजा भक्ती करत आशीर्वाद घेतला. या हंगामात तो नव्या संघामध्ये खेळणार आहे, तसेच तो लवकरच बाबा होणार आहे. त्याने त्याच्या पत्नीसाठी तसेच होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी तसेच उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना केली.
के एल राहुल याआधी लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी आणि पंजाब किंग्स संघासाठी त्याने नेतृत्व केले आहे. या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने 14 करोड रुपयांना मेगा लिलावात खरेदी केले होते. सर्वांना आशा होती की त्याला या संघाचा कर्णधार केले जाईल, पण संघाने अक्षर पटेलवर ही जबाबदारी सोपवली आहे. तसेच संघाचे उपकर्णधार पद डुप्लेसीकडे सोपवलं आहे. तसेच काही रिपोर्ट्स मधून एक गोष्ट समोर येत आहे की, कर्णधार पदासाठी राहुलचेच नाव पहिल्यांदा पुढे होते. पण त्याने स्वतःच अक्षर पटेलला कर्णधार पद सोपवण्यासाठी सांगितले.
भारतीय संघाचा खेळाडू के एल राहुल 17 मार्च रोजी महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्याने चांदी दरवाजातून दर्शन घेतले. डोक्याला अष्टगंध लावून नंतर त्याने आकड्यांचा हार घातला,यानंतर तो नंदी हॉलमध्ये गेला तेथे त्याने नंदीच्या कानामध्ये इच्छा मागितली.
तसेच लवकरच के एल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी लवकरच आई बाबा होणार आहेत. त्यामुळे राहुलने दोघांच्या आरोग्यासाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना केली.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंची यादी (2025)
अक्षर पटेल (कर्णधार), करूण नायर, जेक-फ्रेजर- मेकबर्ग, फाफ डुप्लेसी, ट्रीस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, डोनोवन परेरा, के एल राहुल, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, दर्शन नालकांडे, अजय जादव मंडल, विप्रज निगम, मनवंत कुमार एल, त्रिपुराणा विजय, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मिशेल स्टार्क,मोहित शर्मा, टी नटराजन, मुकेश कुमार.





