आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत 8व्यांदा किताब पटकावला होता. हा किताब जिंकण्यात कुलदीप यादव याने संपूर्ण स्पर्धेत मोलाचे योगदान दिले होते. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात भल्याभल्या फलंदाजांना अडकवले होते. त्याला स्पर्धेतील कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धा संपल्यानंतर भारतात परतताच पुन्हा एकदा कुलदीप यादव बागेश्वर धाम येथे पोहोचला. आता यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत कुटुंबासह कुलदीप यादव धीरेंद्र शास्त्री यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे.
फोटो व्हायरल
बागेश्वर धाम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कुलदीप यादव याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये तो सहकुटुंब बाबा धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी आश्रमात पोहोचला आहे. यादरम्यान कुलदीप त्याच्या आई-वडिलांसोबत बाबाचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “चायनामन नावाने प्रसिद्ध भारतीय फिरकीचा जादूगार आणि पूज्य सरकारचा अप्रतिम शिष्य कुलदीप यादवजी सरकारच्या दर्शनासाठी बागेश्वर धाम येथे पोहोचले.”
चाइनामैंन के नाम से विश्वप्रसिद्ध भारतीय स्पिन जादूगर और पूज्य सरकार के अतिप्रिय शिष्य कुलदीप यादव जी पहुँचे बागेश्वर धाम सरकार के दर्शन हेतु…एशिया कप में मैन ऑफ़ सीरिज़ का ख़िताब जीतने के बाद पूज्य सरकार का आशीर्वाद लेने पहुँचे…आगामी विश्व कप में अच्छे प्रदर्शन के लिए लिया… pic.twitter.com/sofZUwoQnM
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) September 20, 2023
आशिया चषकात केली धमाल
खरं तर, आशिया चषकापूर्वीही कुलदीपने बागेश्वर धामचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत 5 सामने खेळत 9 विकेट्स घेतल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने 28.3 षटके गोलंदाजी केली आणि फक्त 103 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 3.61 इतका होता.
आशिया चषकात कुलदीपला शानदार प्रदर्शनासाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याला बक्षीस म्हणून 15000 यूएस डॉलर म्हणजेच जवळपास 12 लाख 46 हजार रुपये मिळाले होते. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघाने 8व्यांदा आशिया चषक जिंकला होता. आता विश्वचषकातही कुलदीपवर सर्वांच्या नजरा असतील. विश्वचषक 2023 स्पर्धेतही कुलदीप भारतीय संघासाठी शानदार प्रदर्शन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कुलदीपचा दुसरा विश्वचषक
कुलदीप भारतीय संघाच्या ताफ्यात एकमेव तज्ज्ञ फिरकीपटू आहे. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा फिरकी विभागात समावेश आहे. म्हणजेच, कुलदीपवर विश्वचषकात भारतीय खेळपट्ट्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. कुलदीपने आशिया चषक 2023मध्ये पाकिस्तानविरुद्ध 5 आणि श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट्स घेत भारताच्या सुपर-4 फेरीतील विजयात मोलाचा वाटा उचलला होता. हा त्याचा दुसरा वनडे विश्वचषक असेल. तो 2019च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. (cricketer kuldeep yadav visited to dhirendra shastri bageshwar dham sarkar before world cup 2023)
हेही वाचाच-
T20 World Cup 2024: क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी यूएसएतील ‘3’ मैदानं फिक्स, लगेच वाचा
“सचिन, युवी अन् धोनीला वर्ल्डकपसाठी बोलवा”, ऑसी दिग्गजाचा बीसीसीआयला सल्ला