इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेले लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ तुफान कामगिरी करत आहेत. त्यांच्या शानदार परफॉर्मन्समुळे हे दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप ४मध्ये आहेत. रविवारी (०१ मे) आयपीएल २०२२मधील ४५व्या सामन्यात लखनऊने दिल्ली कॅपिटल्सला ६ धावांनी पराभूत केले आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. लखनऊने विजय मिळवला असला, तरीही दिल्लीच्या खेळाडूने केएल राहुलचा घेतलेला झेल मात्र सध्या चांगलाच चर्चेत आहे.
लखनऊने (Lucknwo Super Giants) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या होत्या. यावेळी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूत ७७ धावांची तुफान फटकेबाजी केली. यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या हंगामातील त्याच्या ४०० धावाही पूर्ण झाल्या. राहुलने या हंगामात आतापर्यंत २ शतके आणि २ अर्धशतकेही मारली आहेत. तो या सामन्यात आपले तिसरे शतकही मारण्याच्या खूप जवळ होता. मात्र, दिल्लीच्या ललित यादवने शानदार झेल घेत त्याला तंबूत धाडले. झाले असे की, १९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलने पॉईंटच्या दिशेने मोठा शॉट मारला. हा शॉट सीमारेषा ओलांडण्यापूर्वीच ललित यादवने (Lalit Yadav) हवेत उडी मारत शानदार झेल घेतला. हा झेल घेतला गेला नसता, तर हा थेट षटकार झाला असला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राहुल बाद झाल्यामुळे लखनऊला २०० धावांचा आकडा पार करता आला नाही. राहुलव्यतिरिक्त दीपक हुड्डानेही ३४ चेंडूत ५२ धावा केल्या. हे त्याचे हंगामातील तिसरे अर्धशतक होते.
A brilliant catch from Lalit Yadav ends KL Rahul's stay in the middle.
He departs after a fine knock of 77.
Live – https://t.co/wmwJlb9D5J #DCvLSG #TATAIPL pic.twitter.com/xFaWuuubfW
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
फक्त शार्दुल ठाकूरने घेतली विकेट
सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधाराने रिषभ पंतने (Rishabh Pant) तब्बल ६ गोलंदाजांना आजमावले. मात्र, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज चेतन साकारिया या सामन्यात वेगवान गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांमध्ये तब्बल ४४ धावा दिल्या. फिरकीपटू ललित यादवने एक षटकात १६ धावा दिल्या. तसेच, अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांमध्ये फक्त २५ धावा दिल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गुणतालिकेत घसरण झालीये. ते ६व्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, लखनऊ संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर पहिला क्रमांक गुजरात संघाने काबीज केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्शची प्रामाणिकता दिल्लीला पडली महागात अन् गमावला सामना? वाचा नक्की काय झालं
पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…