मुंबई। रविवारी (१ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ४५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने ६ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीला मिशेल मार्श याच्या विकेटवेळी झालेली एक चूक चांगलीच महागात पडली.
रिव्ह्यू घेतला असता, तर कदाचीत निकाल बदलला असता
या सामन्यात लखनऊने दिल्लीसमोर (LSG vs DC) १९६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने १३ धावांवरच २ विकेट्स गमावल्या होत्या, पण असे असले तरी नंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) यांनी आक्रमक खेळ करत आक्रमक अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी २५ चेंडूतच ६० धावांची भागीदारी केली होती.
मात्र, याचवेळी लखनऊचा फिरकीपटू कृष्णप्पा गॉथमने (Krishnappa Gowtham) टाकलेल्या ८ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मार्शने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकच्या हाती गेला. त्यावेळी त्याने विकेटसाठी अपिल केले. मैदानावरील पंचांनीही त्याला बाद दिले, ज्यानंतर मार्श पॅव्हेलियनकडे परतला. पण, त्यानंतर जेव्हा रिप्ले पाहाण्यात आला, तेव्हा स्पष्ट दिसले की, चेंडू बॅटला लागला नव्हता आणि दिल्लीकडे २ रिव्ह्यू (DRS Review) बाकी होते. त्यामुळे जर मार्शने रिव्ह्यू घेतला असता, तर कदाचीत दिल्लीच्या विजयाची अपेक्षा वाढली असती. कारण, तो बाद झाल्यानंतर कालांतराने दिल्लीने विकेट्स गमावल्या.
मार्शने २० चेंडूत ३७ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते. तसेच त्याचा १८५ चा स्ट्राईक रेट देखील होता. ज्यावेळी मार्श बाद झाला, तेव्हा दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील खूश नव्हता. कारण, मार्श ज्या लयीत फलंदाजी करत होता, त्यावरून जर तो आणखी काही काळ टिकला असता, तर कदाचीत दिल्ली हा सामना जिंकू शकले असते.
https://twitter.com/kinggkohlii18/status/1520749256214454272
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
लखनऊने जिंकला सामना
या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या होत्या. यामध्ये लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने ७७ धावांची आणि दीपक हुडाने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने लखनऊच्या तिन्ही विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने नाबाद ४२ धावा केल्या. त्याचबरोबर मार्शने ३७ आणि रोवमन पॉवेलने ३५ धावांचे योगदान दिले. पण दिल्लीला २० षटकांत ७ बाद १८९ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…
चुकीला माफी नाही! दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूला मोठी शिक्षा, एका क्लिकवर घ्या जाणून