---Advertisement---

अखेरच्या षटकात लखनऊचा दिल्लीवर ६ धावांनी रोमांचक विजय, मोहसिन खान ठरला विजयाचा हिरो

On: रविवार, मे 1, 2022 7:44 PM
Mohsin-Khan
---Advertisement---

रविवारी (दि. १ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४५वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या डबल हेडर सामन्यात लखनऊने शानदार विजय साकारला. त्यांनी ६ धावांनी दिल्लीला धूळ चारली. हा लखनऊचा हंगामातील सातवा विजय होता. लखनऊच्या या विजयाचा हिरो मोहसिन खान ठरला.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना लखनऊने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ ७ विकेट्स गमावत १८९ धावाच करू शकला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हंगामातील पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.

दिल्लीकडून फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३० चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्यात १ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने नाबाद ४२ धावा चोपल्या. तसेच, मिशेल मार्शने ३७ आणि रोवमन पॉवेलने ३५ धावा केल्या. कुलदीप यादव १६ धावांवर नाबाद राहिला.

यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना मोहसिन खानने (Mohsin Khan) खास कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई आणि कृष्णप्पा गॉथम यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ७७ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ५ षटकारही मारले. याव्यतिरिक्त दीपक हुड्डानेही अर्धशतक साकारले. त्याने ३४ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तसेच, क्विंटन डी कॉकने २३, तर मार्कस स्टॉयनिसने नाबाद १७ धावांचे योगदान दिले.

यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना फक्त एकट्या शार्दुल ठाकूरने लक्षवेधी गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

या विजयासह लखनऊ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. दुसरीकडे, दिल्ली संघ सहाव्या स्थानी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, “इथे ज्युनियर सिनियर काही नसतं”

केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश

विराटच्या षटकाराने चाहत्यांचा अटकला श्वास, हवाई फटक्यानंतर कोहलीही झाला होता दंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---