क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. आता यात भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीचीही भर पडली आहे. त्याने बुधवारी(२४ फेब्रुवारी) तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
तिवारीने हुगली जिल्ह्यातील निवडणूकीच्या रॅलीदरम्यान तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.
A new journey begins from today. Need all your love & support. 😊#DidiShowsTheWay #AssemblyElection #WestBengal #JoyBangla pic.twitter.com/TrrFX67USP
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 24, 2021
तत्पूर्वी तिवारीने एक ट्विट करत तो राजकारणात प्रवेश करणार असल्याचेही सांगितले होते. त्याने ट्विट केले होते की ‘आजपासून(२४ फेब्रुवारी) नवीन प्रवास सुरु होत आहे. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. यापुढे हे माझे राजकारणी म्हणून नवीन इंस्टाग्राम अकाऊंट असेल.’ या ट्विटमधून तिवारीने तो राजकारणातील कारकिर्दीबद्दल अपडेट देण्यासाठी नवीन इंस्टाग्राम अकाऊंट चालू करत असल्याचेही सांगितले.
A new journey begins from today. Need all your love & support. From now onwards this will be my political profile on Instagram.https://t.co/uZ9idMW7lD
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 24, 2021
हे माजी क्रिकेटपटू आहेत क्रीडामंत्री
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू लक्ष्मी रतन शुक्ला हे देखील त्रृणमुल काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते हावडा उत्तर विधानसभा मतदार संघामधून निवडून आले होते. त्यांनी निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रुपा गांगुली यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे राज्य क्रीडा मंत्रिपद देण्यात आले.