---Advertisement---

मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना

Australia-Cricket-Team
---Advertisement---

दोन वर्षे संपूर्ण जगाला सतावणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या हा व्हायरस काही देशांपुरता मर्यादित आहे. मात्र, या व्हायरसचा परिणाम पूर्णत: संपला नाहीये. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सिडनी येथे 4 जानेवारीपासून खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीतही याचा परिणाम पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात तब्बल 4 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुनरागमन करणारा खेळाडू या व्हायरसच्या तावडीत सापडला. विशेष म्हणजे, कोरोनाग्रस्त होऊनही हा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील आहे आणि सिडनी कसोटी खेळत आहे.

हा खेळाडू इतर कुणी नसून मॅट रेनशॉ (Matt Renshaw) आहे. मॅटने 4 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केले. मात्र, सामन्यापूर्वीच तो कोरोनाग्रस्त झाला. तरीही तो सिडनी कसोटीत संघाच्या ताफ्यात सामील आहे.

राष्ट्रगीतावेळी तब्येत बरी नसल्याचे वाटताच रेनशॉ इतर संघसहकाऱ्यांपासून दूर उभा राहिला. त्यानंतर सामना सुरू झाल्यावरही तो सीमारेषेच्या शेजारी डगआऊटमध्ये लांब बसल्याचे दिसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने रेनशॉ याच्या आरोग्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, “सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला इतर खेळाडूंपासून दूर करण्यात आले. रेनशॉ याची RAT चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोरोना संक्रमित असूनही तो सिडनी कसोटीत खेळेल.”

रेनशॉ याने ऑस्ट्रेलिया कसोटी संघात 2018नंतर पुनरागमन केले आहे. सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटीत तो ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यादीत त्याच्या नावाचा समावेश आहे. मात्र, कोरोनामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही. त्याच्या जागी आपत्कालीन क्षेत्ररक्षक म्हणून पीटर हँड्सकॉम्ब याला सामील केले गेले आहे.

हँड्सकॉम्ब संघात सामील
ऑस्ट्रेलिया संघाच्या यादीत पीटर हँड्सकॉम्बचे नाव हे आधीच आपत्कालीन क्षेत्ररक्षक म्हणून सामील केले गेले होते. म्हणजेच गरज पडली, तर तो कोरोनाग्रस्त मॅटचा पर्याय म्हणून तयार मैदानात उतरू शकतो. हँड्सकॉम्ब सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळत आहे. मात्र, मंगळवारी (दि. 03 जानेवारी) सामने खेळले गेले नाहीत. तसेच, तो अद्याप सिडनीला पोहोचलेला नाही. (cricketer matt renshaw tests positive for covid on test recall after 4 years still playing in australia vs south africa)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून
रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---