पाकिस्तान संघाला रावळपिंडी येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पाकिस्तानला 74 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तानचा सघ दबावात आला. कारण, आता त्यांना घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवायचा असेल, तर त्यांना पुढील दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील. अशात हे पाहणे रंजक ठरणार आहे की, पुढील दोन कसोटीत पाकिस्तान संघ इंग्लंडचा सामना कसा करतो. तत्पूर्वी पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने खेळपट्टीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने इंग्लंडची चांगली प्रशंसा केली. तसेच, रावळपिंडीच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रिझवान म्हणाला आहे की, त्याला वाटते ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटच्या लायकीची नाहीये.
“That is one of the greatest Test victories you’ve ever seen!”
England achieve an outstanding win 🎉#WTC23 | #PAKvENG | https://t.co/PRCGXi3dZS pic.twitter.com/EsNAZDoqjd
— ICC (@ICC) December 5, 2022
रिझवानने पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जेव्हा तुमच्याकडे असे आव्हान असेल आणि जे पाठलाग करण्याच्या लायकीचे असेल, तर ज्याप्रकारे येथे परिस्थिती होती, आमच्याकडे त्याशिवाय इतर पर्याय नव्हता. माझ्या मते, इंग्लंडने ज्या धैर्याने निर्णय घेतले आणि मेहनत केली, मला वाटते ते या विजयासाठी पात्र होते. आमच्याकडेही गेम प्लॅन होता, पण ही खेळपट्टी अशी नव्हती, जिथे कोणालाही खेळता येईल. ही कसोटी क्रिकेटसाठी चांगली खेळपट्टी नव्हती. मी माझे मत मांडत सल्ला देतो, पण खेळपट्टीकडून ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल मला विचारल्यास मी म्हणेल की, मला माहिती नाही की, इतर लोक काय विचार करतात, पण मला वैयक्तिकरीत्या वाटते की, मला ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटच्या लायकीची वाटत नाही.”
रिझवानकडून इंग्लंड संघाचे कौतुक
पुढे बोलताना रिझवानने इंग्लंड संघाचे चांगलेच कौतुक केले. तो म्हणाला की, “ते जे काही करत आहेत, ते एकदम वेगळे करत आहेत आणि जगात घेऊन येत आहेत. आम्ही एकदम त्यांच्यासारखे येऊन करू शकत नाहीत. आम्ही त्यांच्या बॅटिंगचा आनंद लुटला. आम्ही गोलंदाजी करत होतो, तेव्हाच आम्ही मजाही घेत होतो. ज्याप्रकारे ते खेळत होते, आम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होतो. ही गोष्ट वेगळी आहे की, आम्ही त्यांच्यासारखे करू शकलो नाहीत. जर आम्हाला असे करायचे असेल, तर खूप मोठे निर्णय घ्यावे लागतील. जर आम्हाला तशी फलंदाजी पाहिजे, मला वैयक्तिकरीत्या विचारले, तर कसोटी क्रिकेट एक मोठे क्रिकेट आहे, आम्हाला खूप काही पाहावे लागते. आम्हाला आमच्या ताकदीनुसार, खेळावे लागते. कुठे ना कुठे त्यांच्या शौर्याने हा सामना आमच्याकडून हिरावून घेतला.”
पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना 9 ते 13 डिसेंबरदरम्यान मुलतान येथे खेळला जाणार आहे. (cricketer mohammad rizwan opens up bazzball and rawalpindi pitch after loss in 1st test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! भारतात पुढील तीन महिने बॅक टू बॅक खेळले जाणार क्रिकेट, 3 बलाढ्य संघ येतायेत भारतात
‘…म्हणून आम्ही भारताला हरवू शकलो’, बांगलादेशच्या शतकवीराचा मोठा खुलासा