पाकिस्तानच्या जबरदस्त आणि सर्वात युवा गोलंदाजांमध्ये नसीम शाह याचा समावेश होतो. नसीम शाह याने त्याच्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवली आहे. 19 वर्षीय नसीमकडे शानदार वेगासोबत लाईन आणि लेंथही आहे. नुकतेच त्याने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो त्याच्या आईच्या खूपच जवळ होता. त्याच्या आईची इच्छा होती की, तिने त्याला पाकिस्तानकडून खेळताना पाहावं. मात्र, जेव्हा तो त्याचा पहिला सामना खेळण्यासाठी गेला, तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले होते.
वयाच्या 16व्या वर्षी केले होते पदार्पण
नसीम शाह (Naseem Shah) याने पाकिस्तान संघाकडून वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पदार्पण केले होते. त्याने त्याचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला होता. हा कसोटी क्रिकेट प्रकार होता. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नसीम 20 वर्षांच्या वयात पदार्पण करेल.
Naseem Shah : The emotional Story of a Pakistani Cricketers mother#NaseemShah pic.twitter.com/RdCR0c8DbY
— Super Sports (@Saimch882649112) September 1, 2022
काय म्हणाला नसीम?
नसीम शाह याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “जेव्हा तो 12 वर्षांचा होता, तेव्हा क्रिकेटसाठी घर सोडून लाहोरमध्ये शिफ्ट झालो होतो. जेव्हा माझे पदार्पण होणार होते, तेव्हा एक दिवस आधीच माझ्या आईचा फोन आला, तेव्हा मी आईला म्हटले की, मी उद्यापासून क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. ती टीव्ही पाहत नव्हती आणि क्रिकेटची जाणही नव्हती. मी तिला की, मी लाईव्ह दिसणार आहे, नक्की पाहा.”
आपल्या मुलाखतीदरम्यान नसीम म्हणाला की, “माझी आई खूप खुश होती आणि तिने मला वचन दिले होते की, ती नक्की सामना पाहील. मात्र, जेव्हा मी दुसऱ्या दिवशी उठलो, तेव्हा मला संघ व्यवस्थापनाने सांगितले की, तुझ्या आईचे निधन झाले आहे.” नसीम म्हणतो की, “या घटनेनंतर मी खूपच संघर्ष केला. मला प्रत्येक ठिकाणी आई दिसायची. मी औषधांच्या आहारी गेलो होतो. मी खूप विचार करायचो. हा काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. यादरम्यान मला खूपच दुखापतीही झाल्या. मी आता मजबूत झालो आहे.”
यापूर्वीच्या एका मुलाखतीदरम्यान नसीमने सांगितले होते की, त्याची आई त्याच्या खेळाला नेहमीच पाठिंबा द्यायची. तसेच, वडील याच्या विरोधात होते. त्याच्या वडिलांना खेळ हा गुन्ह्यापेक्षा कमी वाटत नव्हता. मात्र, त्याच्या आईने नेहमीच त्याला पाठिंबा दिला होता.
नसीमच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत 14 कसोटी, 3 वनडे आणि 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 38 विकेट्स, वनडेत 10 विकेट्स आणि टी20त 14 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer naseem shah shared about his mother said she died just before the debut match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकण्यापूर्वी अर्जुनला वडील सचिनने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणालेला, ‘जा आणि…’
अरे हा अमेरिकेचा की भारताचा संघ? यूएसएच्या अंडर 19 टीमवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया