Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट

नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट

November 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Husain-Shah

Photo Courtesy: Twitter/TheRealPCB


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भल्याभल्या फलंदाजांचा घाम काढला आहे. पाकिस्तानच्या या युवा वेगवान गोलंदाजांमध्ये 19 वर्षीय नसीम शाह याचाही समावेश आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेग आणि स्विंग गोलंदाजी केली. यावेळी त्याला विकेट घेता आली नाही, पण त्याच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. नसीम एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे करत असतानाच, त्याचा लहान भाऊ 18 वर्षीय हुसेन शाह देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजीतून आग ओकत आहे.

नसीम शाह (Naseem Shah) याचा लहान भाऊ हुसेन शाहचा व्हिडिओ (Husain Shah) समोर आला आहे, जो आता भलताच व्हायरल होत आहे. हुसेनची गोलंदाजी शैलीही जवळपास नसीमसारखीच आहे. खरं तर, नसीमच्या भावाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

हुसेन शाह (Husain Shah) याने सेंट्रल पंजाबकडून दुसरा प्रथम श्रेणी सामना खेळताना सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी त्याने दाखवून दिले की, तोदेखील त्याच्य भावासारखाच अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे. कायद-ए-आजमच्या एका सामन्यात शानदार गोलंदाजी करत आपली पहिली प्रथम श्रेणी विकेट घेतली. हा वेगवान चेंडू होता, ज्यावर बलुचिस्तानच्या बिलावल इक्बालला आपली विकेट गमावण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटवर आला नाही आणि ग्लोव्ह्जला लागून हेल्मेटला धडकला. तसेच, गलीमध्ये उभ्या असलेल्या तय्यब ताहिर याच्या हातात गेला. त्यामुळे इक्बालला आपली विकेट गमवावी लागली.

Hunain Shah picks up his first wicket in first-class cricket ☝️

Watch Live ➡️ https://t.co/LcfNgwD2hw#QeAT | #CPvBAL pic.twitter.com/ORrjwhsQJL

— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 17, 2022

Pakistan is not a pace factory, it's entire Pace Industry.
Here is Naseem Shah's younger brother Husain Shah. Just 18 years old.#CrickertTwitterpic.twitter.com/iLij0pSE7M

— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) November 17, 2022

हुसेनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला क्रिकेट प्रेमींची जोरदार पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे पाकिस्तानचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. हुसेनकडे नसीमसारखीच कमी वयात चांगली गती आणि स्विंग आहे. (pakistan pacer naseem shah’s brother husain shah is rocking now his maiden first class wicket see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगज्जेता इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियासमोर ढेर, कर्णधाराने पराभवासाठी ‘यांना’ धरले जबाबदार
अरेरे! ज्या दिग्गजांना न्यूझीलंडमध्ये जास्त डिमांड, त्यांनाच अश्विनने प्लेइंग इलेव्हनमधून काढले बाहेर


Next Post
Kerala Blasters FC

हैदराबाद एफसीची अपराजित मालिका खंडित; केरला बास्टर्सने दिला पराभवाचा धक्का

File Photo

आंतरशालेय हॉकी: सेंट जोसेफ प्रशालेचा दणदणीत विजय

Photo Courtesy: Instagram/babitaphogatofficial

वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास 5 गोष्टी घ्या जाणून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143