शुक्रवारी (दि. 21 ऑक्टोबर) होबार्ट येथे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या पहिल्या राऊंडचा 11वा सामना पार पडला. हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड संघात खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडने 9 विकेट्सने विजय मिळवत सुपर 12फेरीत प्रवेश केला. मात्र, वेस्ट इंडिजचा विश्वचषकातील प्रवास इथेच संपला. मात्र, यादरम्यान वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ओडियन स्मिथ याने मारलेल्या एक अविश्वसनीय षटकाराने सर्वांचे लक्ष वेधले. हा षटकार या विश्वचषकातील दुसरा सर्वात लांब षटकार होता. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ओडियन स्मिथ (Odean Smith) याने कशाप्रकारे षटकार मारला हे दिसते. हा व्हिडिओ वेस्ट इंडिज संघाच्या डावातील शेवटच्या षटकाचा आहे. आयर्लंडकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी मार्क अडेअर आला होता. त्याने दुसरा चेंडू फुल टॉस टाकला आणि त्यावर स्मिथने डीप मिडविकेटच्या दिशेने जोरदार शॉट मारला. हा चेंडू हवेत खूपच दूर गेला. यावेळी या षटकाराची लांबी 106 मीटर इतकी होती. यापूर्वी यूएईच्या जुनैद सिद्दीकी याने 109 मीटरचा सर्वात लांब षटकार मारला होता.
ओडियन स्मिथचा हा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने सांगितले की, हा दुसरा सर्वात लांब षटकार आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “टी20 विश्वचषक 2022मधील आतापर्यंतचा दुसरा सर्वात लांब षटकार.” या व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/Cj9vQtovwh5/?utm_source=ig_embed&ig_rid=9dc4d02e-f31a-4981-9e36-50d1b853329f
सामन्याविषयी थोडक्यात
खरं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 146 धावा चोपल्या. यावेळी संघाकडून ब्रेंडन किंग याने सर्वाधिक 62 धावा चोपल्या. दुसरीकडे, जॉनसन चार्ल्स याने 24 आणि ओडियन स्मिथ याने 19 धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून गोलंदाजी करताना गॅरेथ डेलानी याने 4 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
यावेळी, आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघाने फक्त 1 विकेटच्या नुकसानीवर 17.3 षटकात 150 धावा करत सामना जिंकला. त्यांच्याकडून पॉल स्टर्लिंग याने नाबाद 66 आणि एँड्र्यू बेलबर्नी याने 37 धावा चोपल्या. बेलबर्नी बाद झाल्यानंतर लॉर्कन टकर हा फलंदाजीला आला. त्याने यावेळी नाबाद 45 धावा चोपल्या आणि आपल्या संघाला सुपर 12 फेरीसाठी क्वालिफाय करण्यात मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, दोन वेळा चॅम्पियन बनलेल्या वेस्ट इंडिज संघाला सुपर 12चा भाग बनण्यात अपयश आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच
इंग्लंडच्या दिग्गजाने केले शिक्कामोर्तब! म्हणतोय, “केएल राहुल जगातील नंबर वन फलंदाज”