---Advertisement---

लय वाईट! ‘या’ 3 धुरंधरांना IPL 2023मध्ये मिळेना संधी, फलंदाजीने मैदानात आणू शकतात वादळ

On: शनिवार, एप्रिल 29, 2023 6:57 PM
Quinton-De-Kock
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023चा अर्धा हंगाम संपला आहे. स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. यादरम्यान अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोनेही केले. काही अनुभवी खेळाडूंनीही आपलं नाणं खणकवलं आहे. मात्र, या स्पर्धेत असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना संघांनी अद्याप खेळण्याची संधीच दिली नाहीये. हे तिन्ही खेळाडू परदेशी असून सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र, त्यांना अद्याप मैदानावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देण्यात आली नाहीये. चला तर कोण आहेत ते तीन खेळाडू जाणून घेऊयात…

क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा भाग आहे. डी कॉकवर लखनऊने 6.75 कोटी रुपये खर्च केले होते. त्याने मागील हंगामात संघासाठी 15 सामन्यात 508 धावा केल्या होत्या. तरीही यावर्षी आतापर्यंत त्याला मैदानावर उतरण्याची संधी देण्यात आली नाहीये.

खरं तर, यामागील कारण आहे काईल मेयर्स (Kyle Mayers). हंगामाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये डी कॉक उपलब्ध नव्हता. अशात संघाने मेयर्सला संधी दिली. या कॅरेबियन अष्टपैलूने संधीचं सोनं करत कमालीचं प्रदर्शन केले. तसेच, डी कॉकला बाकावर बसण्यास भाग पाडले.

जो रूट
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जो रूट (Joe Root) याचेही आयपीएल 2023मध्ये हेच हाल आहेत. रूट हा स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा भाग आहे. रूटला राजस्थानने 1 कोटी रुपयात संघात घेतले होते. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत 10948 धावा, वनडेत 6207 धावा आणि 32 आंतरराष्ट्रीय टी20त 893 धावा केल्या आहेत. मात्र, त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दसून शनाका
श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) चालू हंगामात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग आहे. त्याला गुजरातने केन विलियम्सन याचा बदली खेळाडू म्हणून संघात घेतले होते. श्रीलंकाने जेव्हा भारताचा अखेरचा दौरा केला होता, तेव्हा शनाकाने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला चांगलाच त्रास दिला होता. तरीही त्याला गुजरातने पदार्पणाची संधी दिली नाहीये. (cricketer quinton de kock joe root dasun shanaka unlucky players in ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉवर नहीं, फायर हैं! गुरबाजने पंड्याला ठोकले खणखणीत षटकार, स्वप्नातही विसरणार नाही कॅप्टन, Video
KKR vs GT सामन्यात खास पराक्रम! ‘या’ 3 खेळाडूंनी ठोकले अनोखे शतक; तुम्हीही म्हणाल, ‘भारीच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---