---Advertisement---

जबरदस्त डाईव्ह मारत राधाने एका हातात पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून दीप्तीलाही बसला शॉक, Video Viral

Radha-Yadav
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. स्पर्धेचा पाचवा आणि आपल्या दुसरा सामना खेळण्यासाठी दिल्ली संघ मंगळवारी (दि. 08 मार्च) मैदानावर उतरला होता. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने पुन्हा एकदा दम दाखवून दिला. त्यांनी या सामन्यात यूपी वॉरियर्झ महिला संघाला 42 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह दिल्लीने सलग दुसरा सामना खिशात घातला. दिल्ली संघासोबतच त्यांच्या खेळाडूंनीही सामन्यादरम्यान ‘लाजवाब’ कामगिरी केली. राधा यादव या खेळाडूने केलेल्या कामगिरीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्झ संघापुढे तब्बल 212 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी संघाचे फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकले नाहीत. यूपीची जबरदस्त खेळाडू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिलादेखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ती फलंदाजी करत असताना दिल्लीकडून 11वे षटक शिखा पांडे टाकत होती. तिच्या पहिल्याच चेंडूवर दीप्तीने जोरदार फटका मारला. मात्र, यावेळी राधा यादव हिने अविश्वसनीय झेल (Radha Yadav Catch) घेतला. हा झेल पाहून दीप्तीही हैराण झाली.

https://twitter.com/wplt20/status/1633149919111581696

खरं तर, आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूपी संघाला पहिला धक्का हा 29 धावांवर कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिच्या रूपात बसला. ती 17 चेंडूत 24 धावा करून तंबूत परतली. तिला जेस जॉनसनने राधाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर 31 धावांवर यूपीने दुसरी विकेट गमावली. यावेळी किरण नवगिरे (Kiran Navgire) 2 धावा करून तंबूत परतली. तिला जेस जॉनसनने एलिस कॅप्सीच्या हातून झेलबाद केले.

याच धावसंख्येवर यूपीला तिसरा धक्का बसला. श्वेता सेहरावत फक्त 1 धाव करून बाद झाली. तिला मारिझाने केप (Marizanne Kapp) हिने यष्टीरक्षक तानिया भाटियाच्या हातून झेलबाद केले. यानंतर क्रीझवर दीप्ती शर्मा आणि ताहलिया मॅकग्रा या जोडीने डाव सांभाळला. मात्र, 11व्या षटकात दीप्तीदेखील शिखा पांडेच्या गोलंदाजीवर राधा यादवकडून झेलबाद झाली.

या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीप्तीने लाँग ऑनच्या दिशेने एक शॉट मारला, परंतु चेंडू थेट हवेत गेला. तसेच, राधानेही चित्त्याच्या वेगाने डाईव्ह मारत एका हाताने शानदार झेल घेतला. त्यामुळे दीप्ती 12 धावा करून तंबूत परतली. राधाचा हा झेल पाहून स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या भुवयाही उंचावल्या. आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. (cricketer radha yadav stunning catch of deepti sharma dc vs up warriors in wpl2023 video goes viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीकडून पराभूत होताच यूपीची कर्णधार स्पष्टच बोलली; म्हणाली, ‘आमच्या पराभवाचं हेच मोठं कारण…’
दिल्लीचा धडाका कायम! युपीला नामोहरम करत मिळवला सलग दुसरा विजय, मॅकग्राची एकाकी झुंज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---