अफगाणिस्तान क्रिकेट संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. यातील अनेकजण इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. यापैकीच एक रहमानुल्लाह गुरबाज हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कोलकाता संघ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभूत झाला होता. अशात संघाचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध गुरुवारी (दि. 6 एप्रिल) झाला. या सामन्यात गुरबाजने इतिहास रचला. तो अशी कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore) संघ फलंदाजीला उतरला. कोलकाताकडून रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) आणि वेंकटेश अय्यर हे सलामीला उतरले होते. मात्र, डावाच्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर वेंकटेशची विकेट पडली. याच षटकातील पुढच्या चेंडूवर डेविड विली याने मनदीप सिंग यालाही शून्यावर तंबूत धाडले. मात्र, गुरबाज एका बाजूने डाव सांभाळत होता. कोलकाताची धावसंख्या 47 असताना कर्णधार नितीश राणा हादेखील 1 धावेवर झेलबाद झाला.
यानंतर गुरबाज याने वादळी फलंदाजी केली. त्याने संघाची धावसंख्या 47वरून थेट 89पर्यंत पोहोचवली. गुरबाजने यावेळी त्याने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच, एकूण 44 चेंडूत 57 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले. हे त्याचे आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे, तो आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला.
Gurbaz on 🔥 mode. 5️⃣0️⃣ on the board! 🙌@RGurbaz_21 | #KKRvRCB | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/yeqIu9pg9c
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
गुरबाजची स्पर्धेतील कामगिरी
गुरबाजने आयपीएलमधील पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने मोठी खेळी केली नाही, पण त्याच्या खेळीमुळे संघाच्या धावसंख्या मोलाची भर पडली. त्याने यादरम्यान 16 चेंडूत 22 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 3 चौकार मारले. मात्र, या सामन्यात कोलकाताला पंजाबकडून 7 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. (cricketer Rahmanullah Gurbaz becomes the first Afghanistan batsman to score a fifty in IPL history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टार फलंदाजाला समजली अश्विनची ताकद, कॅरम बॉलने ऑफ स्टंप्स थेट उडवला
नाणेफेकीचा कौल ‘या’ संघाच्या पारड्यात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन