इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 44वा सामना मंगळवारी (दि. 2 मे) गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना दिल्लीने 5 धावांनी जिंकला. या विजयासह दिल्लीने हंगामातील तिसरा विजय साकारला. मात्र, या सामन्यात एकेवेळी गुजरात टायटन्स संघाचा फलंदाज राहुल तेवतिया याने सलग 3 चेंडूत तीन षटकार मारून दिल्ली संघाच्या चिंतेत भर घातली होती. मात्र, शेवटच्या षटकात ईशांत शर्मा याने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्ली संघ या सामन्यात विजयी होण्यात यशस्वी झाला.
गुजरात संघाला अकेरच्या 2 षटकात विजयासाठी 33 धावांची आवश्यकता होती. 19व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या एन्रीच नॉर्किया याने पहिले तीन चेंडू उच्च दर्जाचे टाकले, ज्यावर फलंदाजांना फक्त 3 धावाच घेता आल्या. मात्र, त्यानंतर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने उच्च दर्जाच्या फलंदाजाची नजराना दाखवला. नॉर्कियाच्या अखेरच्या तीन चेंडूत नॉर्कियाने सलग तीन षटकार मारले. अशाप्रकारे गुजरातने नॉर्कियाच्या षटकात 21 धावांची लूट केली. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/IPL/status/1653469200059625472
https://twitter.com/im_shivansh20/status/1653457572991758336?s=20
तेवतियाची फलंदाजी पाहून दिल्ली संघासोबतच कदाचित त्यांच्या चाहत्यांच्या काळजातही धस्स झाले असणार. तेवतिया दिल्लीला विजय मिळवून देतोय की काय असे यावेळी वाटत होते. मात्र, अखेरच्या षटकात सर्व डाव पालटला.
गुजरात टायटन्सच्या डावातील अखेरचे षटक अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) टाकण्यासाठी आला होता. यावेळी गुजरातला विजयासाठी 12 धावांची गरज होती. ईशांतच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर तीन धावा निघाल्या. तसेच, चौथ्या चेंडूवर तेवतियाची विकेट पडली. तेवतिया रायली रुसोच्या हातून झेलबाद झाला. यावेळी तेवतियाने 7 चेंडूत 20 धावा केल्या. यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता.
तेवतियाची विकेट पडताच गुजरातच्या आशांचा चुराडा झाला. दिल्लीच्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकात 125 धावाच करता आल्या. यामध्ये हार्दिक पंड्या याने 53 चेंडूत नाबाद 59 धावांचे योगदान दिले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. दिल्लीने या विजयासह प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. (cricketer rahul tewatia hat trick six on anrich nortje over social media reacts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलने वाढवलं BCCIचं टेन्शन! दुखापतीवर आली मोठी अपडेट, कृणाल पंड्या करणार लखनऊचे नेतृत्व
‘तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली’, विराट आणि गंभीरमध्ये काय बाचाबाची झाली? एका क्लिकवर घ्या जाणून






