Ravichandran Ashwin IPL 2024 Predictions: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगाम सुरू होण्यापूर्वी 19 डिसेंबर रोजी दुबईत मिनी लिलाव होणार आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत सहभागी 10 फ्रँचायझींसोबतच चाहतेही या लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, चाहते भलतेच उत्साही आहेत की, लिलावात कोण-कोणत्या खेळाडूंवर जास्त बोली लागेल. अशातच भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याने आपल्या वेगळ्या अंदाजात लिलावापूर्वी काही खेळाडूंच्या किंमतीचा अंदाज लावला आहे.
भारताचा 37 वर्षीय दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतो. तसेच, तो चाहत्यांसाठी नेहमीच मजेदार व्हिडिओ शेअर करतो. चाहत्याप्रमाणे त्यालाही लिलावाची प्रतीक्षा आहे. रविवारी (दि. 17 डिसेंबर) अश्विनन त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने क्रिकेटच्या वेगवेगळ्या शॉटद्वारे लिलावातील रक्कम ठरवली आहे. त्याने डिफेन्स शॉटची रेंज 2 ते 4 कोटी ठेवली आहे. तसेच, ड्राईव्ह (4 ते 7 कोटी), पुल शॉट (7 ते 10 कोटी), स्लॉग शॉट (10 ते 14 कोटी) आणि हेलिकॉप्टर शॉटची रेंज 14 कोटींपेक्षा जास्त ठेवली आहे.
त्यानंतर अश्विनने शॉट खेळत काही खेळाडूंचे फोटो दाखवत त्यांच्या लिलावात विकल्या जाण्याची रक्कम सांगितली आहे. अश्विननुसार, शाहरुख खान (Shahrukh Khan) 10 ते 14 कोटी रुपयांमध्ये विकला जाईल. त्याने न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आणि वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेल यांच्या 4 ते 7 कोटीत विकल्या जाण्याची आशा व्यक्त केली. तसेच, हर्षल पटेल आणि गेराल्ड कोएट्जी 7 ते 10 कोटींच्या रक्कमेत विकले जातील. याव्यतिरिक्त त्याने 14 कोटींपेक्षा जास्त रक्कमेत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांचेही नाव घेतले. अशाप्रकारे त्याने अनेक प्रमुख खेळाडूंच्या किंमतीचाही अंदाज लावला आहे.
Ravichandran Ashwin predicts price of players:
1) Shahrukh Khan – 10 to 14 cr
2) Rachin – 4 to 7 cr
3) Harshal – 7 to 10 cr
4) Rovman- 4 to 7 cr
5) Coetzee – 7 to 10 cr
6) Head – 2 to 4 cr
7) Umesh – 4 to 7 cr
8) Cummins – 14+ cr
9) Starc – 14+ cr
10) Hasaranga – 10 to 14 cr pic.twitter.com/8i6r4Gied8— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2023
View this post on Instagram
विशेष म्हणजे, आयपीएल 17 हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावात 333 खेळाडूंची नावे निवडली गेली आहेत. त्यातील 214 भारतीय आणि 119 खेळाडू परदेशी आहेत. यामध्ये एकूण 116 कॅप्ड, 215 अनकॅप्ड आणि 2 सहयोगी देशाचे खेळाडू आहेत. 10 फ्रँचायझी मिळून एकूण 77 खेळाडू आपल्या ताफ्यात जोडतील. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. (cricketer ravichandran ashwin gives his ipl 2024 auction predictions in unique style)
हेही वाचा-
Sachin Tendulkar: वडिलांच्या जन्मदिनी सचिनची काळजाला भिडणारी पोस्ट; म्हणाला, ‘माझे वडील नेहमीच…’
विराट आणि गंभीरमध्ये सर्वात Aggressive कोण? माजी भारतीय खेळाडू म्हणतो, ‘तो जरा जास्तच…’