महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्याच लिलावात एकूण 20 खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली गेली. सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबईत पार पडलेल्या या लिलावात भारतीय स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिच्या नावाचाही समावेश आहे. ऋचाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 1.90 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, ऋचाची मूळ किंमत ही फक्त 50 लाख रुपये होती. अशात वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी कोट्याधीश बनल्यानंतर ऋचाने महत्त्वाचे विधान केले आहे. तिने तिची इच्छा व्यक्त केली आहे. चला तर ती या रुपयांचं काय करणार आहे, हे जाणून घेऊया…
कोट्याधीश बनल्यानंतर ऋचा घोष (Richa Ghosh) हिने सांगितले आहे की, तिला तिच्या आई-वडिलांसाठी कोलकातामध्ये एक घर खरेदी करायचे आहे. तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी खूप संघर्ष केला आहे. तसेच, आता तिला त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे, असेही ती पुढे बोलताना म्हणाली.
काय म्हणाली ऋचा?
ऋचा घोषने लिलावानंतर सांगितले की, तिला या पैशातून तिच्या आई-वडिलांसाठी फ्लॅट घ्यायचा आहे. ती म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांसाठी कोलकाता येथे फ्लॅट घ्यायचा आहे. त्यांनी खूप मेहनत केली आणि अजूनही काम करत आहेत. माझे वडील अजूनही पंचगिरी करत आहेत, पण माझ्या आई-वडिलांनी काम करू नये आणि फक्त आराम करत आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे.”
ऋचाने सातत्याने देशासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचे फळ तिला महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेच्या लिलावात मिळाले. 19 वर्षांच्या वयात ऋचा कोट्याधीश बनली. आता तिने तिच्या आई-वडिलांसाठी कोलकाता (Kolkata) येथे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/T20WorldCup/status/1624802217600380930
ऋचाने खूपच कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवले होते. तिला विश्वचषक संघातही निवडले गेले होते. यानंतर ती संघातून आत-बाहेर होत राहिली. मात्र, शेवटी तिने भारतीय संघात आपली जागा पक्की केली. तिने एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपली ओळख बनवली. 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात तिला भारतीय संघात सामील करण्यात आले होते. या स्पर्धेत जेव्हा जेव्हा संघाला तिची गरज पडली, तेव्हा तेव्हा ऋचाने बॅटसोबत देशाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच, भारताला पहिले-वहिले विश्वविजेतेपद मिळवून देण्यातही मोलाचे योगदान दिले. (cricketer richa ghosh wants to buy house for parents from money she got in wpl auction 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पोरी चमकल्या! टी20 रँकिंगमध्ये जेमिमा अन् ऋचाला मोठा फायदा, तर स्म्रीती टॉप-3मध्ये कायम
जगभरात कोट्यवधी चाहते असणारा शाहरुख बनला विराट-जडेजाचा फॅन; म्हणाला, ‘मलाही शिकायचंय…’





