यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध वादळी फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 47 चेंडूत 98 धावांची नाबाद खेळी साकारली. विशेष म्हणजे, तो 13 चेंडूत आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा खेळाडूही बनला. खरं तर, आयपीएल इतिहासावर एक नजर टाकली, तर आतापर्यंत एकूण 4 भारतीय खेळाडूंनी 21 वर्षांच्या वयात शतक ठोकले आहे. यापैकी एका भारतीय खेळाडूकडे भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जाते. चला तर त्या 4 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात…
‘या’ खेळाडूंनी केलंय शतक
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेत अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी शतक ठोकले आहे. मात्र, आयपीएलमध्ये 21 वर्षांच्या वयात शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यात फक्त 4 नावे समोर येतात. स्पर्धेच्या इतिहासात रिषभ पंत (Rishabh Pant), यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal), मनीष पांडे (Manish Pande) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी 21 वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये शतक (IPL Century At the Age of 21 Years) करण्यात यशस्वी ठरले.
या खेळाडूंनी 21 वर्षांच्या वयात आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली होती. यादरम्यान रिषभ पंत याने 128, यशस्वी जयसवाल याने 124, मनीष पांडे याने 114 आणि देवदत्त पडिक्कल याने 101 धावांची खेळी साकारली. पंतकडे त्याच्या दमदार कामगिरीसाठी भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाते. पंत सध्या दुखापतग्रस्त आहे आणि तो आयपीएल 2023 (IPL 2023)मधूनही बाहेर आहे.
यशस्वी जयसवाल तुफान फॉर्ममध्ये
यशस्वी जयसवाल याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑरेंज कॅपसाठी फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याची चिंता वाढवली आहे. आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत फाफ अव्वलस्थानी आहे. तो फाफपासून फक्त 1 धाव दूर आहे. फाफने 11 सामन्यात 576 धावा केल्या आहेत. तसेच, जयसवालने 12 सामन्यात 575 धावा केल्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये ऑरेंज कॅपसाठी काट्याची टक्कर सुरू आहे. (cricketer rishabh pant yashasvi jaiswal manish pandey and devdutt padikkal scored ipl 100 at age of 21)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेत ‘पलटण’ने गमावला टॉस, रोहितसेनेची पहिली बॅटिंग; गुजरात प्ले-ऑफमध्ये करणार का एन्ट्री?
ऑरेंज कॅपसाठी युवा अन् अनुभवी खेळाडूमध्ये काट्याची टक्कर! ‘या’ फलंदाजांमध्ये फक्त 1 धावेचे अंतर