भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यांच्या भविष्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत मिळालेल्या दारुण पराभवानंतर आता दोघांचे भविष्य काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, रोहित शर्मा टी20 क्रिकेट प्रकारात खेळणार नाही. तसेच, बीसीसीआयनेही त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट आणि भविष्यातील योजनांसाठी लवकर बैठक घेण्याविषयी चर्चा केली. अशातच आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे की, रोहित आणि विराट दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी खास तयारी करणार आहेत.
रोहित आणि विराटची खास योजना
भारतीय संघ (Team India) 10 डिसेंबरपासून ते 7 जानेवारीपर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात प्रत्येकी 3 सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिका होतील. त्यानंतर दोन्ही संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या दोन कसोटी सामन्यांपूर्वी रोहित शर्मा (Rohti Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेच्या मैदानांवर खास सराव करताना दिसतील. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय अ संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाल चेंडूने 3 चार दिवसीय सामने खेळेल. अशात वृत्त समोर येत आहे की, रोहित आणि विराट भारत अ संघासोबत कसोटी मालिकेपूर्वी सराव करतील.
दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणे कठीण
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला आहे, इंग्लंडमध्येही इंग्लंडला पराभूत केले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत नेहमीच संघाने संघर्ष केला आहे. 2021-22 दौऱ्यातही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय संघ यावेळी विजय मिळण्याच्या प्रयत्नात असेल. यासाठी संघात वरिष्ठ खेळाडू जसे की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानांवर खास तयारी करू शकतात. म्हणजेच, असे झाले, तर हे खेळाडू या दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेला मुकू शकतात. (cricketer rohit sharma future plan virat kohli update ind vs sa series schedule team india)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
टी20 मालिका
पहिला सामना- 10 डिसेंबर (डर्बन)
दुसरा सामना- 12 डिसेंबर (केबेरा)
तिसरा सामना- 14 डिसेंबर (जोहान्सबर्ग)
वनडे मालिका
पहिला सामना- 17 डिसेंबर (जोहान्सबर्ग)
दुसरा सामना-19 डिसेंबर (केबेरा)
तिसरा सामना- 21 डिसेंबर (पार्ल)
कसोटी मालिका
पहिला सामना- 26-30 डिसेंबर (सेंच्युरियन)
दुसरा टेस्ट- 3-7 जानेवारी (केपटाऊन)
हेही वाचा-
भारतीय कर्णधाराविषयी मुरलीधरनचा मोठा दावा! म्हणाला, ‘रोहित शर्मा पुढचा विश्वचषक…’
‘माझ्या काकांसाठी वाईट वाटतंय…’, WC Finalमधील पराभवानंतर द्रविडची पुतणी हळहळली, वाचाच