वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघात 2 नवीन फलंदाजांना ताफ्यात सामील करण्यात आले. त्यापैकी एक नाव पुणेकर ऋतुराज गायकवाड याचेही होते. भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऋतुराजने आधीच पदार्पण केले होते. मात्र, यावेळी विंडीज दौऱ्यावर त्याला कसोटी संघाचाही भाग बनवण्यात आले आहे. आयपीएलमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराजने आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आता त्याच्या प्रतिभेवर कर्णधार रोहित शर्मा हादेखील फिदा झाला आहे. रोहितने ऋतुराजचे कौतुक केले आहे.
काय म्हणाला रोहित?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचे कौतुक केले. तो म्हणाला की, “ऋतुराजमध्ये लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याची पूर्ण प्रतिभा आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत दाखवून दिले आहे की, तो कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे. आता ही त्याची वेळ आहे आणि मला आशा आहे की, तो आगामी काळात भारतीय संघासाठी खूप जास्त धावा करताना दिसेल.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 42च्या सरासरीने केल्या धावा
ऋतुराज गायकवाड याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी पाहायची झाली, तर ती शानदार राहिली आहे. 26 वर्षीय ऋतुराजने महाराष्ट्र संघाकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 28 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 47 डावात 42.19च्या सरासरीने 1941 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे. ऋतुराजची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 195 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
ऋतुराजची भारताकडून खेळतानाची कामगिरी
भारतीय संघाकडून खेळताना ऋतुराजने आतापर्यंत 1 वनडे आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याला फक्त 19 धावा करता आल्या होत्या, तर टी20त त्याने 16.87च्या सरासरीने 135 धावा करू शकला आहे. ऋतुराजच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. (cricketer rohit sharma on ruturaj gaikwad said this know here)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! पाकिस्तानला जाणार नाही टीम इंडिया आणि जय शाह, कुठे होणार IND vs PAK सामना?
WI vs IND : काय होता डॉमिनिकामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्याचा निकाल? धोनी ठरलेला टीकेचा धनी