---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा भावनिक ट्विट

On: बुधवार, ऑक्टोबर 24, 2018 3:22 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने ट्विट करत गोलंदाज प्रवीण कुमारच्या उत्कृष्ठ गोलंदाजीची आठवण काढली आहे. यामध्ये त्याने प्रवीणची भरपूर प्रशंसा केली आहे.

यावेळी रोहितने प्रवीण सोबतचा पवेलियनमध्ये बसलेला फोटो या ट्विटमध्ये टाकला असून त्याने त्यात आपण दोघांनी सोबतच देशासाठी खेळायला सुरूवात केली. मी प्रवीणची ऑस्ट्रेलियातील सीबी मालिकेतील दुसऱ्या अंतिम सामन्यातील गोलंदाजी विसरूच शकत नाही,असे म्हटले आहे.

तसेच प्रवीण याआधीच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबतचा ट्विट केला आहे.

रोहितच्या ट्विटला प्रवीणने ही धन्यवाद असे उत्तर दिले आहे. ‘याबरोबरच त्याने आपण दोघांनी सोबत राहून चांगले भावाचे नाते तयार केले. सध्या तू ज्याप्रकारे खेळत आहे त्याचा आनंद आहे, असे म्हटले आहे.

2007मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर प्रवीणने भारताकडून 68 सामन्यात 36. 02च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 6 कसोटी सामन्यात 27 विकेट्स आणि 10 टी-20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

–प्रत्येक विकेटमागे दहा रूपये मिळवणाऱ्या खेळाडूला मिळाली क्रिकेटमधील सर्वात मोठी संधी

–८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळवेल

–दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment