भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दारुण पराभव पत्करला. या पराभवानंतर रोहितवर सातत्याने टीकास्त्र डागले जात आहे. खरं तर, भारतीय संघ 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला होता. अशाप्रकारे मागील एका दशकापासून भारत फक्त पराभवाचे पाणी चाखताना दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली जात आहे. अशात जर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपद वाचवायचे असेल, तर 3 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चला त्याविषयी जाणून घेऊयात…
कर्णधारपद वाचवण्यासाठी रोहित शर्माला कराव्या लागतील या 3 गोष्टी
1. फिटनेसवर द्यावे लागेल लक्ष
रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे. वाढत्या वयासोबत रोहितचा फिटनेस त्याच्यासाठी सर्वात मोठी अडचण बनली आहे. मैदानावर रोहितच्या नावावर अनेक शानदार विक्रम आहेत, पण फिटनेसमुळे नेहमीच त्याला प्रश्न विचारले जातात. अशात जर रोहितला त्याचे कर्णधारपद वाचवायचे असेल, तर त्याला वर्कआऊटवर विशेष लक्ष द्यावे लागेल. पुढील महिन्यात भारताचा वेस्ट इंडिज दौरा आहे. त्यासाठी रोहितला स्वत:ला ताजेतवाणे ठेवावे लागेल.
2. फॉर्म आणावा लागेल परत
खरं तर, रोहितचा फॉर्म हा भारतीय संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही रोहितच्या बॅटमधून खास खेळी निघाली नव्हती. पहिल्या डावात फक्त 15 आणि दुसऱ्या डावात 43 धावा करून रोहित लवकर बाद झाला होता. अशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी त्याला आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.
3. दबावाशिवाय संघाला करावे लागेल तयार
तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधार असल्यामुळे रोहितवर नेहमीच दबाव असतो. मात्र, दबावामुळे कधीच गोष्टींवर तोडगा निघत नाही. अशात त्याला सामन्यात शांत डोक्याने निर्णय घ्यावे लागतील. रोहितने या तीन गोष्टींवर लक्ष दिले, तर कदाचित त्याच्याकडून कुणीच भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेऊ शकणार नाही. (cricketer rohit sharma will have to do these works to save indian team captaincy)
महत्वाच्या बातम्या-
MPL 2023 । ईगल नाशिक टायटन्सचा पहिला पराभव, रत्नागिरी जेट्सची प्लेऑफमध्ये थाटात एन्ट्री
पुणेरी बाप्पा करणार का प्ले ऑफ्सचे तिकिट पक्के? रॉयल्सविरुद्ध महत्वाचा सामना