---Advertisement---

करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 2:26 PM
Sam-Curran
---Advertisement---

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची आयपीएल 2023 लिलावात चांदी झाली आहे. अष्टपैलू सॅम करन याने तर इतिहास रचला. करनवर आयपीएल 2023च्या मिनी लिलावात पैशांचा पाऊस पडला आहे. तो आतापर्यंतचा सर्वात महागडा आयपीएल खेळाडू बनला आहे. करनला पंजाब किंग्स संघाने तब्बल 18.50 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. यानिमित्ताने करनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

अवघ्या 24व्या वर्षी सॅम करन (Sam Curran) याच्यावर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लावली गेली. त्याला पंजाब किंग्स  (Punjab Kings) संघाने 18.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. अशाप्रकारे त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिस याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. मॉरिसला आयपीएल 2021च्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने 16.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले होते.

https://twitter.com/IPL/status/1606227823877922817

सॅम करनचे वैयक्तिक आयुष्य
करनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तो मैदानाबाहेर एक बिनधास्त आयुष्य जगतो. करनची गर्लफ्रेंड खूपच सुंदर आहे. तिचे नाव इसाबेला सायमंड्स विलमॉट (Isabella Symonds Willmott) असे आहे. इसाबेलाही 24 वर्षांची असून ती लंडनमध्ये राहते. तिने इंग्लंडमधील एक्सेटर विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. करन आणि इसाबेलाची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. पुढे ते एकमेकांशी सोशल मीडियाद्वारे बोलू लागले. करन अनेकदा गर्लफ्रेंड इसाबेलासोबत दिसतो. आयपीएल 2019 हंगामादरम्यानही करण आणि इसाबेला एकत्र दिसले होते. स्टेडिअममध्येही इसाबेला ही करनला चीअर करताना दिसली होती. इसाबेला सोशल मीडिया सेन्सेशन आहे.

https://www.instagram.com/p/CYTb5qQMxJb/?hl=en

गर्लफ्रेंड इसाबेला सायमंड्स विलमॉट आणि सॅम करन (Isabella Symonds Willmott And Sam Curran) यांना फिरण्याची खूपच आवड आहे. हे दोघेही एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळेच, करनने आयपीएल 2019मध्ये इसाबेलाला सोबत नेले होते.

https://www.instagram.com/p/CVYxAbEsH1s/?hl=en

https://www.instagram.com/p/COzhfxBjiao/?hl=en

तरीही करन आणि इसाबेला यांची पहिली भेट कधी झाली होती याचा अद्याप खुलासा झाला नाहीये. स्वत: करनने त्याच्या इंस्टाग्रामवर इसाबेलासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे दोघेही सुट्ट्यांचा आनंदही लुटताना दिसतात.

https://www.instagram.com/p/CJgiwqBjrTT/?hl=en

विश्वचषक विजेता करन
नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषकात करन मॅच विनर ठरला होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत 13 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यातही त्याने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. सॅम करनला अंतिम सामन्यातील कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. (cricketer sam curran girlfriend isabella symonds willmott photo ipl most expensive player ipl auction 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ
कपड्यांप्रमाणे संघ बदलणारा ‘हा’ खेळाडू दिल्लीच्या गोटात, आयपीएलमध्ये झळकावून बसलाय शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---