---Advertisement---

सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 18, 2023 12:26 PM
Sarfaraz-Khan
---Advertisement---

फेब्रुवारी 2023मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करूनही सरफराज खान याला संघात सामील केले गेले नाही. असे असूनही त्याचा आत्मविश्वास कमी झालेला नाहीये. त्याने पुन्हा एकदा शतक झळकावले आहे. सरफराजने दिल्लीविरुद्ध शतक झळकावल्यानंतर दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या अंदाजात सेलिब्रेशन केले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

शतक झळकावल्यानंतर सरफराज खान सेलिब्रेशन (Sarfaraz Khan Celebration) करताना दिसला. यावेळी त्याचा राग स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर त्याने ‘थाय फाईव्ह’ करत शानदार रिऍक्शनही दिली. यामागील कारण जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते. ज्यावेळी त्याला या ऍक्शनविषयी कारण विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, “हे सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्यासाठी होते. मला आणि हार्दिक तमोरेला त्याची गाणी खूप आवडतात. मी पहिल्या सामन्यात त्याच्या आठवणीत असाच जल्लोष केला होता. मात्र, हॉटस्टारने ते दाखवले नव्हते. मी त्यानंतर निश्चय केला की, दुसऱ्यांदा शतक झळकावेल, तेव्हाही हीच ऍक्शन पुन्हा करेल.”

सरफराजची भन्नाट खेळी
सरफराज खान याने मुंबई संघाकडून खेळताना 155 चेंडूत 125 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 16 चौकारांचाही पाऊस पाडला होता. सरफराजने शानदार प्रदर्शन केल्यामुळे मुंबई संघाला पहिल्या डावात 293 धावा करता आल्या. सरफराजने सहाव्या विकेटसाठी शम्स मुलाने याच्यासोबत महत्त्वाची भागीदारी रचली.

मुंबईच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर सरफराजला वगळता इतर खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 40 धावांवरच तंबूत परतला. कर्णधार अजिंक्य रहाणे 2 धावा, तर मुंबई संघाचे इतर काही फलंदाजही दोन आकडी धावसंख्या पार करू शकले नाहीत. (cricketer sarfaraz khan celebrate century vs delhi in siddhu moosewala style video viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटसाठी खूपच खास आहे न्यूझीलंड मालिका, मोडू शकतो सेहवाग आणि पाँटिंगसारख्या दिग्गजांचा ‘हा’ विक्रम
सचिनसोबत विक्रमी भागीदारी, 7 सामन्यात दोन द्विशतके, तरीही अवघ्या 2 वर्षात संपली कांबळीची कारकीर्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---