---Advertisement---

टीम इंडियात स्थान मिळत नसलेल्या क्रिकेटरचा धमाका, रोहितसेनेविरुद्ध 61 चेंडूत केल्यात ‘इतक्या’ धावा

Sarfaraz-Khan
---Advertisement---

Sarfaraz Khan Hundred in 61 Balls: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका संपुष्टात आली आहे. टी20 मालिका 1-1ने बरोबरीत सुटली, तर वनडे मालिकेत भारताने 2-1ने विजय मिळवला. यानंतर आता उभय संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी एका सराव सामन्यादरम्यान सरफराज खान याने शानदार खेळ दाखवला. या सामन्यात सरफराजने वादळी फलंदाजी करत अवघ्या 61 चेंडूत शतक झळकावले.

खरं तर, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत आणि भारत अ (India vs India A) संघात सराव सामना खेळला गेला. 3 दिवसीय इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यादरम्यान रोहित शर्मा याच्या संघाविरुद्ध मुंबईचा विस्फोटक फलंदाज सरफराज खान याने टी20 अंदाजात खेळत वादळी फलंदाजी केली आणि शतक साजरे करण्यासाठी 61 चेंडूंचा सामना केला.

भारतीय संघातील जागेसाठी पाहतोय वाट
यावेळी त्याने 65 चेंडूंचा सामना करत नाबाद 103 धावांची खेळी केली. खरं तर, भारतीय संघात जागा शोधण्याचा सरफराज पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 41 सामन्यात 71.70च्या सरासरीने 3657 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, नाबाद 301 ही त्याची यादरम्यानची सर्वोच्च खेळी आहे. असे असूनही सरफराजला भारतीय संघात जागा मिळत नाहीये. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे संघात एका खेळाडूसाठी जागा झाली आहे.

कुठे खेळला जाणार पहिला कसोटी सामना?
सामन्याविषयी बोलायचं झालं, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA Test) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर यादरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळला जाईल. वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ, दक्षिण आफ्रिकेतही पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. (cricketer sarfaraz khan hits century in 61 ball against india intra squad match in south africa)

हेही वाचा-
IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने
IND vs SA । संजू सॅमसनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मागच्या तीन-चार महिन्यात मानसिक…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---