मंगळवारपासून (दि. 17 जानेवारी) मुंबई विरुद्ध दिल्ली संघात रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेच्या ब गटातील सामना खेळला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा युवा विस्फोटक फलंदाज सरफराज खान याने कठीण परिस्थितीत संघासाठी आणखी एक शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील 4 कसोटीपैकी पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याला त्यामध्ये संधी मिळाली नाहीये. त्यामुळे निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित होत असतानाच आता सरफराजने शतक ठोकले आहे.
सरफराजचे 135 चेंडूत शतक
सरफराज खान (Sarfaraz Khan) याने मुंबई (Mumbai) संघाकडून खेळताना 135 चेंडूत शतक झळकावले. विशेष म्हणजे, 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सिराजने पहिल्या 20 चेंडूंवर एकही धाव घेतली नव्हती. मात्र, त्यानंतर त्याने वेगाने धावा चोपण्यास सुरुवात केली. 37वा प्रथम श्रेणी सामना खेळत असलेल्या सरफराजचे हे 13वे शतक आहे. 53 डावांनंतर त्याची सरासरी 82च्याही वर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 हून अधिक डाव खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये फक्त सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांची सरासरी सरफराजपेक्षा चांगली आहे.
संघाला अडचणीतून काढले बाहेर
या सामन्यात मुंबईने वेगवान सुरुवात केली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याने फक्त 35 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 40 धावा चोपल्या. मात्र, 13 धावांच्या आतच मुंबईने त्यांचे अव्वल 4 फलंदाज गमावले होते. त्यानंतर सरफराज खान याने प्रसाद पवार (25) याच्यासोबत मिळून संघाची धावसंख्या 100 धावांच्या पलीकडे पोहोचवली. सहाव्या विकेटसाठी त्याने सम्स मुलानी (39) याच्यासोबत 144 धावांची भागीदारी रचली.
Hundred and counting! 💯
Yet another impressive knock from Sarfaraz Khan 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/sV1If1IQmA#RanjiTrophy | #DELvMUM | @mastercardindia pic.twitter.com/GIRosM7l14
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 17, 2023
प्रशिक्षकानेही ठोकला सलाम
मुंबई संघाचे प्रशिक्षक अमोल मुजूमदार (Amol Muzumdar) यांनी शतक ठोकल्यानंतर सरफराज खानसाठी आपली टोपी काढून सलाम ठोकला. सरफराजने पहिल्या डावात फलंदाजी करताना 155 चेंडूत 125 धाव चोपल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 16 चौकारांचा पाऊस पाडला. (cricketer sarfaraz khan scored another century in ranji trophy vs delhi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध
मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी; ‘स्टायलिश’ फलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल