---Advertisement---

आता कशी आहे रिषभ पंतची तब्येत? ‘गब्बर’ने भेट घेऊन दिली अपडेट

On: गुरूवार, जून 1, 2023 12:02 PM
Shikhar-Dhawan-And-Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मागील वर्षीच्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. मात्र, आता पंत लवकर बरा होत आहे. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याने नुकतीच बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे रिषभ पंत याची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटोही धवनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पंत आधीपेक्षा चांगला दिसत आहे.

‘गब्बर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याने इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या भेटीचे फोटो शेअर केले. या फोटोत दोघेही खेळाडू मैदानावर दिसत आहेत. फोटोत शिखर धवन रिषभ पंत (Shikhar Dhawan Rishabh Pant) याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो शेअर करत धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “परतला आणि आधीपेक्षा खूप चांगला. तुला पुन्हा पाहून खूप आनंदी आहे.” विशेष म्हणजे, धवन यापूर्वीही पंतला भेटण्यासाठी पोहोचला होता.

डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आहे. तो लवकर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करू शकतो. काही दिवसांपूर्वी पंतचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो कशाचाही आधार न घेता चालताना दिसला होता. तसेच, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेदरम्यान तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडिअममध्येही पोहोचला होता. विशेष म्हणजे, भारतात या वर्षीच्या अखेरीस वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. अशात क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की, पंत तोपर्यंत संघात पुनरागमन करेल.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेला पंतचा अपघात
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुडकी येथे जाताना कार अपघात झाला होता. यावेळी पंत स्वत: गाडी चालवत होता. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर सर्जरीही झाली होती. दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 स्पर्धेलाही मुकला होता. पंत सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे असून रिहॅब करत आहे. बोर्डाने पंतला दोन फिजिओही दिले आहेत, जे त्याच्या बरे होण्यावर काम करत आहेत. बीसीसीआयला आशा आहे की, पंत आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी एकदम फिट होईल. (cricketer shikhar dhawan give big update on rishabh pant health know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CSKच्या सीईओंचा धोनीबाबत मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, ‘खरंय, तो गुडघ्याच्या दुखापतीसाठी…’
Video: ज्यांच्यामुळे IPL Final होऊ शकली, त्यांना कसा विसरेल धोनी; ट्रॉफी उंचावल्यानंतर केलं ‘हे’ काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---