भारतीय क्रिकेट संघाचा जबरदस्त फलंदाज शिखर धवन याला ‘गब्बर’ म्हणूनही ओळखले जाते. नुकतेच आयपीएलचा १५वा हंगाम पार पडला. या स्पर्धेत धवनची बॅट चांगलीच तळपली. त्याने ४०० हून अधिक धावा चोपल्या. इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी सलामीवीर फलंदाज म्हणून इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळाली आहे. यावर्षी टी२० विश्वचषक होणार आहे. अशात प्रशिक्षक राहुल द्रविड याला युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. अशातच आता आयपीएल गाजवणाऱ्या धवनला त्याचा मुलगा झोरावर याची आठवण येतेय. त्यासाठी तो त्याला भेटायलाही पोहोचलाय.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगा झोरावर (Zoravar) याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, त्याने लिहिले आहे की, “खूप आठवण आली, मुलाला भेटून आनंद होतोय.” खरं तर झोरावर हा त्याची आई आयशा धवन (Ayesha Dhawan) हिच्यासोबत राहतोय. धवन आणि आयशाचा घटस्फोट झाला आहे. धवनच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
https://www.instagram.com/p/CeYS3MZu7SM/?utm_source=ig_web_copy_link
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “मुलापासून दूर असणे किती कठीण असते. हे काळजाचे तुकडे-तुकडे करून टाकते.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “ज्युनिअर गब्बर.” धवनबद्दल सांगायचं झालं, तर तो आयपीएलदरम्यानही सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय होता. त्याने फोटो आणि व्हिडिओही शेअर केले होते.
वनडे संघात मिळू शकते स्थान
शिखर धवनला टी२० संघात जागा मिळाली नसली, तरी तो वनडे संघात स्थान मिळवू शकतो. टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे. याशिवाय जुलैमध्ये संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर ३ वनडे सामने खेळायचे आहेत. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. अशा स्थितीत धवन संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्याने १४९ वनडे सामन्यांमध्ये ४५.५४च्या सरासरीने ६२८४ धावा चोपल्या आहेत. त्याने या धावा करताना १७ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत.
याव्यतिरिक्त धवनने भारतीय संघाकडून ३४ कसोटी आणि ६८ टी२० सामनेही खेळले आहेत. यादरम्यान कसोटीत त्याने ४०.६१च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसरीकडे, टी२०त त्याने २७.९२च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ अर्धशतकांचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?