---Advertisement---

याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बाऊंड्री लाईनवर धावत हेटमायरने पकडला अचंबित करणारा कॅच, व्हिडिओ पाहाच

On: गुरूवार, मे 11, 2023 9:59 PM
Shimron-Hetmyer
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत नव्या जुन्या खेळाडूंनी हैराण करणारे एकापेक्षा एक झेल घेतले आहेत. अशात यामध्ये आणखी एका खेळाडूच्या झेलाचा समावेश झाला आहे. तो खेळाडू म्हणजेच शिमरॉन हेटमायर होय. आयपीएल 2023च्या 56व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. या सामन्यात हेटमायरने चित्त्याची चपळाई दाखवत खतरनाक क्षेत्ररक्षण केले आणि झेल घेतला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाता संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज मैदानावर उतरले होते. यावेळी डावातील दुसरे षटक ट्रेंट बोल्ट टाकत होता, तर स्ट्राईकवर जेसन रॉय (Jason Roy) होता. पहिल्या चेंडूवर रॉयने चौकार मारला. त्यानंतर बोल्टने दुसरा चेंडू रॉयला टाकला असता त्यावर रॉयने जोरदार फटका मारला. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल असे वाटत असतानाच सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याने चित्त्याची चपळाई दाखवत अफलातून झेल पकडला.

जेसन रॉय याने फ्लिक शॉट खेळला. मात्र, त्याला त्याच्या शॉटवर नियंत्रण ठेवता आले नाही. रॉयच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू हवेत उडाला, त्यानंतर शिमरॉन हेटमायर डीप स्क्वेअर लेगहून धावत सुटला आणि सीमारेषेजवळ उडी मारत चेंडू हवेत पकडला. यावेळी त्याने सीमारेषेला स्पर्श करण्यापासून स्वत:ला व्यवस्थित सावरले. आता यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/IPL/status/1656665784113041414?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656665784113041414%7Ctwgr%5E5d3d36256029e324ee790823e9b7edd1dcd4b236%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwatch-shimron-hetmyer-takes-a-stunning-running-catch-to-dismiss-jason-roy-kkr-vs-rr-ipl-2023-122480

खरं तर, या सामन्यात रॉय खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे राजस्थानविरुद्ध तो 8 चेंडूत फक्त 10 धावा करून तंबूत परतला. रॉयने त्याच्या खेळीत 2 चौकारांची बरसात केली. डावाअखेर केकेआर संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 149 धावा करू शकला. तसेच, केकेआरपुढे 150 धावांचे सोपे आव्हान ठेवले.

राजस्थानच्या डावात यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर सलामीला उतरले होते. यावेळी जयसवालने पहिल्याच षटकात 26 धावा चोपल्या. दुसऱ्या षटकात बटलरने चौथ्या चेंडूवर धावबाद होऊन विकेट गमावली. तो यावेळी शून्यावर तंबूत परतला. 2 षटकांनंतर राजस्थानने 1 विकेट गमावत 40 धावा केल्या. (cricketer shimron hetmyer takes a stunning running catch to dismiss jason roy kkr vs rr ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! चहलने रचला इतिहास, ब्रावोच्या विक्रमाला धक्का देत बनला IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---