भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या ग्रँड स्लॅम कारकीर्दीची सांगता पराभवाने झाली. सानिया आणि तिचा जोडीदार रोहन बोपन्ना यांना ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेच्या मिश्र दुहेरी अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यात सानिया आणि बोपन्न यांना ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस जोडीने 6-7, 2-6 अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. सानिया अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने सानियासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे.
आधीच केली होती निवृत्तीची घोषणा
सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने जानेवारी 2023च्या सुरुवातीला घोषणा केली होती की, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australian Open 2023) हा तिचा अखेरचा ग्रँड स्लॅम असेल. आता निवृत्ती घेण्यापूर्वी सानिया यूएईमध्ये आणखी दोन स्पर्धेत भाग घेणार आहे. आधी ती अबू धाबीत बेथनी माटेक सँड्ससोबत खेळेल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मॅडिसन कीजसोबत दुबईत पार पडणाऱ्या डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेसोबत कारकीर्दीचा शेवटचा निरोप देईल.
सानिया अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर तिचा पती आणि क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) हादेखील भावूक झाला. त्याने ट्विटरवर लिहिले की, “तू क्रीडा क्षेत्रात सर्व महिलांसाठी एक आशा आहेस. तू तुझ्या कारकीर्दीत जे काही गवसले आहे, त्यासाठी तुझा अभिमान आहे. तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस, कायम मजबूत राहा. अविश्वसनीय कारकीर्दीसाठी खूप खूप अभिनंदन.”
– You are the much needed hope for all the women in sports. Super proud of you for all you have achieved in your career. You're an inspiration for many, keep going strong. Many congratulations on an unbelievable career… pic.twitter.com/N6ziDeUGmV
— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) January 27, 2023
सानिया-शोएब घटस्फोटाच्या चर्चा
शोएब मलिकची ही पोस्ट खूपच महत्त्वाची आहे. कारण, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक (Sania Mirza And Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी असेही सांगितले आहे की, हे जोडपे वेगळे झाले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघेही त्यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिक याच्या सहपालकाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र, ते सध्या एकत्र राहत नाहीत. मात्र, दोघांकडून याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
सानिया मिर्झाविषयी
सानिया मिर्झा ही भारताची सर्वोत्तम महिला टेनिसपटू ठरली आहे. तिने आतापर्यंत ग्रँड स्लॅम दुहेरीत 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यातील तीन मिश्र दुहेरीत, तर उर्वरीत तीन विजेतेपद महिला दुहेरीत जिंकले आहेत. तिने तिचा शेवटचा ग्रँड स्लॅम 2016मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीतील खिताब जिंकून मिळवला होता. आता सानियाचे सातवे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न तुटले आहे. (cricketer shoaib malik emotional post for his wife sania mirza indian tennis star aus open 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्नीसोबत नाचतानाही अक्षरने सोडले नाही क्रिकेट, डान्स फ्लोअरवर लावला षटकार अन् पकडला कॅच; व्हिडिओ पाहाच
सूर्याने विराट-रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान, टी20त फक्त 5 भारतीयांना जमलीय ‘ही’ कामगिरी