INDWvsENGW: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. अशात इंग्लंड महिला संघ भारतीय महिलांना व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत होता. मात्र, भारतीय संघाने हा सामना 5 विकेट्सने खिशात घातला. या विजयाची शिल्पकार आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करणारी श्रेयंका पाटील ठरली. तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर तिने मोठे विधान केले.
श्रेयंका पाटील चमकली
या सामन्यात इंग्लंड महिला (England Women) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 10 विकेट्स गमावत 126 धावा केल्या. यावेळी भारतीय अष्टपैलू श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) चमकली. तिने यावेळी एक-दोन नाही, तर 3 विकेट्स घेतल्या. तिने 4 षटकांत फक्त 19 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला (Indian Women) संघाने स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या सर्वाधिक 48 धावांच्या जोरावर 19 षटकात 5 विकेट्स गमावत 127 धावा करत विजय मिळवला. अशाप्रकारे भारताने मालिका 1-2ने संपवत व्हाईटवॉश टाळला.
काय म्हणाली श्रेयंका?
श्रेयंका ही फक्त 21 वर्षांची आहे. ही तिची भारताकडून पहिलीच टी20 मालिका होती. तिने पदार्पणाच्या मालिकेत चेंडूतून आपली छाप सोडली. तिने एकूण 5 विकेट्स घेतल्या. तिने दुसऱ्या चेंडूत फक्त 2 चेंडू टाकले होते. तिने 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्या सामन्यात ती जरा महागडी ठरली होती. तिने 44 धावा खर्च केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या टी20त तिने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावण्याजोगी कामगिरी केली. सामन्यानंतर श्रेयंका म्हणाली की, “मी खूपच खुश आहे. मी पहिल्यांदा तीन विकेट्स घेतल्या आहेत. माझे कुटुंब आणि प्रशिक्षक सामना पाहत होते. आनंदी आहे आणि असेच प्रदर्शन पुढेही कायम ठेवायचे आहे.”
पुढे बोलताना ती म्हणाली की, “महिला प्रीमिअर लीग (डब्ल्यूपीएल) आणि भारत अ संघात मिळालेल्या अनुभवाची मला मदत झाली. भारतीय संघाचा भाग बनून खुश आहे. याचा आनंद घेत आहे. दीप्ती शर्मासोबत गोलंदाजी करणे माझ्यासाठी खूपच मोठा अनुभव आहे. ती मला पाठिंबा देत आहे. ती मैदानावर आणि मैदानाबाहेर माझ्याशी संवाद साधत आहे. तिच्यासोबत पुढेही गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. मी तिन्ही विकेट्सचा आनंद घेतला. त्यातील कोणतीही एक विकेट निवडे खूपच कठीण आहे.”
विशेष म्हणजे, तिसऱ्या सामन्यात श्रेयंकाव्यतिरिक्त भारतासाठी साइका इशाक हिनेही 3 विकेट्स नावावर केल्या. तसेच, रेणुका सिंग आणि अमनजोत सिंग यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. (cricketer shreyanka patil takes three wickets during india women vs england women 3rd t20i gets player of the match award in debut series)
हेही वाचा-
‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात
IND vs SA: पहिला टी20 सामना टॉसशिवाय रद्द, पाऊस बनला व्हिलन