---Advertisement---

भारतीय वाघ दुखापतीतून सावरला, दिल्ली काबीज करण्यासाठी श्रेयस अय्यरचे टीम इंडियात पुनरागमन

On: मंगळवार, फेब्रुवारी 14, 2023 7:35 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याचे संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने नागपूर कसोटीपूर्वी अय्यरला बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे खबरदारीचा उपाय म्हणून पाठवले होते. मात्र, आता त्याचे पुनरागमन झाल्याची माहिती स्वत: बीसीसीआयने ट्वीट करत दिली आहे.

बीसीसीआयचे ट्वीट
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)  याला पाठीची दुखापत होती. त्यामुळे तो मागील महिन्यात पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला होता. अशात बीसीसीआयने ट्वीट करत निवेदन जारी केले आहे. हे निवेदन जारी करत त्यांनी कॅप्शनमध्ये “दिल्ली कसोटीसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघात सामील झाला आहे,” असे लिहिले आहे.

निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, “पाठीच्या दुखापतीनंतर श्रेयस अय्यर याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे यशस्वीरित्या उपचार घेतले आहेत. तसेच, बीसीसीआय वैद्यकीय पथकानेही त्याला मंजुरी दिली आहे.”

अय्यर हा महिनाभरापासून संघाबाहेर होता. मात्र, आता तो संघात परतल्याने संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी देण्याची शक्यता आहे.

पहिला कसोटी सामना
नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तसेच, मालिकेतही 1-0ने आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जाणार आहे. दिल्लीत भारताने मागील 36 वर्षात एकही कसोटी सामना गमावला नाहीये. अशात भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer Shreyas Iyer joins India squad in Delhi ahead of 2nd Test against Australia Border-Gavaskar Trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लेक असावी तर अशी! WPL लिलावात 19व्या वर्षी ऋचा बनली कोट्याधीश; आई-वडिलांसाठी करणार ‘हे’ मोठे काम
भारताच्या पोरी चमकल्या! टी20 रँकिंगमध्ये जेमिमा अन् ऋचाला मोठा फायदा, तर स्म्रीती टॉप-3मध्ये कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---