Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला ‘हा’ भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला 'हा' भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला

February 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
cheteshwar pujara shreyas iyer

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून त्याने दुखापतीमुळे माघार घेतली होती. आता अशी महिती मिळत आहे की, श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून देखील माघार घेऊ शकतो. बॉर्डर गावसकरट्रॉफीतील हा दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळला जाऊ शकतो.

दिल्लीच्या फिरोज जशा कोटला स्टेडियमवर शुक्रवारी (17 फेब्रुवारी) रोजी सुरू होणाऱ्या या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळणार की नाही, याविषयी अद्याप कुठली अधिकृत माहिती बीसीसीआयकडून मिळाली नाहीये. पण माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयर अय्यार नागपूर कसोटीनंतर आता दिल्ली कसोटीतून देखील माघार घेऊ शकतो. श्रेयसने नुकतेच बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत श्रेयस स्ट्रेंथ ऑन्ड कंडिशनिंगचाा सराव करत होता. यावेळी त्याच्यासोबत ट्रेनर एस रजनीकांत देखील दिसले.

श्रेयस अय्यर पहिल्या कोसोटीतून बाहेर पडल्यानंतर त्याला रिहॅब करण्यासाठी एनसीएमध्ये पाठवले गेले. अशात दुसऱ्या कसोटीसाठी पुनरागमन करण्यासाठी त्याला आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागेल. याच कारणास्तव त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी थेट आंतरराष्ट्रीय संघात सामील करता येणार नाही. श्रेयस अय्यरला त्याची फिटनेस सिद्ध करण्यासाठी निवड समितीकडून एक संधी मिळू शकते. ईरानी कपच्या अंतिम सामन्यात अय्यरल त्याची फिटनेस सिद्ध करू सखतो. हा सामना एक ते पाच मार्चदरम्यान मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया संघात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) यालाही अशाच पद्धतीने कसोटी संघात पुनरागमन करण्याआधी रणजी ट्रॉफीत एक सामना खेळावा लागला होता.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील सध्या संघातून बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला संघात निवडले गेले नव्हते. तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह संघात पुनरागमन करणे अपेक्षित होते. पण सध्या तसे होताना दिसत नाहीये. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियासोबत तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे. संघाच्या आगामी वेळापत्रकाचा विचार करून बुमराहाला वनडे संघातून देखील बाहेर ठेवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बुमराह आता थेट आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसू शकतो. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून रोजी सुरू होणार आहे. या सामन्यात देखील बुमराहची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यव्यतिरिक्त यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी बुमराह पूर्णपणे फिट असणे गरजेचे असेल, ज्यामुळे संघ व्यवस्तापन बुमराहाला जास्त सामन्यात न खेळवण्याच्या प्रयत्नात आहे. (Shreyas Iyer has been ruled out of the second Test against India)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हैदराबाद एफसी दुसरा क्रमांक पटकावण्यासाठी एटीके मोहन बागानविरुद्ध खेळणार
गोष्ट जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूलची, चोरीचा झालेला आरोप


Next Post
Prithvi Shaw Nidhhi Tapadiaa

'वॅलेंटाईन्सन डे'ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले...

Haris Rauf David Miller

सूर्या बनण्याच्या प्रयत्नात मिलरने गमावली विकेट, हॅरिस रौफचा घातक चेंडूची सर्वत्र चर्चा

Danielle-Wyatt

महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार; 'या' दिग्गज खेळाडूने थेट सोशल मीडियावर मांडले दु:ख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143