Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हैदराबाद एफसी दुसरा क्रमांक पटकावण्यासाठी एटीके मोहन बागानविरुद्ध खेळणार

हैदराबाद एफसी दुसरा क्रमांक पटकावण्यासाठी एटीके मोहन बागानविरुद्ध खेळणार

February 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hyderabad FC

Photo Courtesy: Twitter/Hyderabad FC


मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)ची लीग शिल्ड जिंकल्यानंतर हैदराबाद एफसीच्या स्वप्नांना तडा गेला. पण, हिरो आयएसएलमध्ये दुसरे स्थान पक्कं करण्यासाठी त्यांनी उर्वरित तीन सामन्यांत दोन गुणांची कमाई करायची आहे. मंगळवारी त्यांच्यासमोर घरच्या मैदानावर एटीके मोहन बागान यांचे आव्हान असणार आहे. हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी अॅथलेटिक्स स्टेडियमवर ही लढत होणार आहे. एटीके मोहन बागान यांनाही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय तितकाच महत्त्वाचा आहे.

एटीके मोहन बागान प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत, परंतु मागील पाच सामन्यांत त्यांना केवळ एकच विजय मिळवता आला आहे. त्यांनी अव्वल चारमध्ये त्यांचे स्थान कायम राखले असले तरी बंगळुरू एफसी आणि त्यांचे समान २८ गुण आहेत. पण, त्यांच्या हातात एक अतिरिक्त सामना आहे. त्यांना अखेरच्या दोन सामन्यांत केरळा ब्लास्टर्स आणि ईस्ट बंगाल एफसी यांचा सामना करायचा आहे.

गोल करण्यात येत असलेले अपयश ही एटीके मोहन बागानसमोरील सर्वात मोठी अडचण आहे. पाच सामन्यांत त्यांना केवळ तीन गोल करता आले आहेत. मागील लढतीत जमशेदपूर एफसीने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मागील पाच सामन्यांती तिन्ही गोल हे दिमित्री पेट्राटोसने केले आहेत. एटीके मोहन बागानला यंदाच्या पर्वात २० गोल करता आले आहेत आणि तालिकेत तळावर असलेले दोन संघ याबाबतीत त्यांच्या मागे आहेत. २० पैकी १२ गोल हे पेट्राटोस व ह्युगो बौमोस या जोडीने केले आहेत.

या दोघांना अन्य सहकाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. ”खरं सागांयचं तर मी तीन गुण मिळवून तिसऱ्या क्रमांक पटकावण्याचा विचार जास्त करतोय. प्ले ऑफमधून बाहेर पडलो तर काय हा विचार डोक्यात नाही. ही आमची मानसिकता नाही. हैदराबादमध्ये जाऊन तीन गुण कमावण्यासाठी लढत देणे, ही आमची मानसिकता आहे. शनिवारी बंगळुरूकडून केरळा ब्लास्टर्सचा पराभव झाला आणि ही आमच्यासाठी आगेकूच करण्याची संधी आहे,”असे फेरांडो म्हणाले.

हैदराबाद एफसी आणि मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ यांना मागील आठवड्यात ओडिशा एफसीकडून पराभव पत्करावा लागल्याने चिंता सतावत असेल. मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर यंदाच्या पर्वात प्रथमच हैदराबाद एफसीविरुद्ध एखाद्या संघाला तीन गोल करता आले आहेत. एटीके मोहन बागानने २६ नोव्हेंबरच्या लढतीत ओडिशा एफसीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हैदराबाद एफसीला मंगळवारच्या लढतीत अधिक जोर लावून खेळावे लागेल.

”आताच्या घडीला प्रत्येक सामना आव्हानात्मक आहे आणि ५-६ संघ उर्वरित ४ जागांसाठी प्रयत्न करत आहेत. अशा संघांविरुद्ध खेळणे खरंच आव्हानात्मक आहे. देशातील जी लोकं फुटबॉलवर प्रेम करतात त्यांनाही माहित्येय एटीके मोहन बागानचा संघ किती तगडा आहे, परंतु आम्हाला पराभूत करणे सोपं नक्की नाही, ”असे मार्क्युझ म्हणाले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांत एटीके मोहन बागानने तीन विजय मिळवले आहेत आणि तीन लढती ड्रॉ राहिल्या आहेत. हैदराबादने मागील पर्वात उपांत्य फेरीतील पहिल्या लेगमध्ये एटीकेवर विजय मिळवला होता. (Hyderabad FC will play against ATK Mohun Bagan for second place)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

गोष्ट जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूलची, चोरीचा झालेला आरोप
पाकिस्तानला पस्त केल्यानंतर विराटनेही केले ‘हरमन ब्रिगेड’चे कौतुक, खास ट्विट करत लिहिले…


Next Post
cheteshwar pujara shreyas iyer

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला 'हा' भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला

Prithvi Shaw Nidhhi Tapadiaa

'वॅलेंटाईन्सन डे'ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले...

Haris Rauf David Miller

सूर्या बनण्याच्या प्रयत्नात मिलरने गमावली विकेट, हॅरिस रौफचा घातक चेंडूची सर्वत्र चर्चा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143