भारतीय टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा सोळावा हंगाम रविवारी (12 फेब्रुवारी) संपन्न झाला. पुणे येथील तरुण रॅपर एमसी स्टॅन याने या हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले. त्याच्या या यशानंतर अनेक क्षेत्रातील लोक त्याचे अभिनंदन करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने देखील त्याचे खास सोशल मीडिया पोस्ट करत अभिनंदन केले.
भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध रियालिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. या शोच्या सोळाव्या हंगामाचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. पुणे येथील रॅपर एमसी स्टॅन याने महाराष्ट्राचा युवा कलाकार तसेच बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे याला मागे टाकत विजेतेपद पटकावले. महाअंतिम सोहळ्याच्या फायनलिस्टमध्ये टेलिव्हिजन अभिनेता शालीन भनोट, अर्चना गौतम व मॉडेल प्रियंका चहर चौधरी यांचा समावेश होता. मात्र, सर्वाधिक वोट्स मिळवत विजेतेपद आपल्या नावे केले.
त्याच्या या विजयानंतर भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने ट्विट पोस्ट करत लिहिले,
Big big congratulations @MCStanofficia for winning Bigg boss S 2023 ❤️❤️❤️❤️good luck for future ❤️#MCStan #bhaijaan #Biggboss @BeingSalmanKhan pic.twitter.com/2iQXO1UcFF
— ???????????????????????????????? ???????????????????? (@MdShami11) February 12, 2023
‘खूप खूप अभिनंदन एमसी स्टॅन बिग बॉस जिंकण्यासाठी. तुला भविष्यासाठी खूप शुभेच्छा’
शनि हा सध्या भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. नागपूर येथील पहिल्या कसोटी उत्कृष्ट गोलंदाज करताना तीन बळी आपल्या नावे केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्ली येथे खेळला जाईल.
(Mohammad Shami Congratulations MC Stan For Winning Big Boss 2023)