---Advertisement---

कोण आहे शुबमन गिलची सर्वात मोठी प्रेरणा? म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर…’

On: मंगळवार, मे 10, 2022 10:06 PM
Shubman-Gill
---Advertisement---

गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२२मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. या संघात अनेक धाकड खेळाडूंचा समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल होय. गिल सध्या गुजरात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गिलने यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी गिलने एक मोठे विधान केले. त्याने त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये मोठी प्रेरणा असलेल्या दिग्गज खेळाडूबद्दल सांगितले.

शुबमन गिल (Shubman Gill) याने सामन्यापूर्वी बोलताना आपल्यासाठी प्रेरणा असलेल्या खेळाडूचे नाव सांगितले. तो म्हणाला की, तो दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला आपली प्रेरणा मानायचा. मात्र, त्याने निवृत्ती घेतल्यानंतर आता तो विराट कोहली (Virat Kohli) याचा फॅन आहे.

भारतासाठी १३ सामने खेळणारा शुबमन म्हणाला की, “मी मोठा होत असताना माझी सर्वात मोठी प्रेरणा होते सचिन सर. जेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली आणि मी हा खेळ जरा जास्त समजू लागलो, तेव्हापासूनच मी विराट भाईचा चाहता बनलो.”

शुबमन गिल आपल्या आयपीएल २०२२मधील कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला की, “मी हंगामाची सुरुवात चांगली केली, पण मधल्या सामन्यांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज होती. टी२० क्रिकेटमध्ये हे घडणारंच आहे. तुम्ही काही चांगले फटके माराल जे थेट क्षेत्ररक्षकाकडे जातील. तुम्हाला काही दुर्दैवी मार्गाने विकेट्स गमवाव्या लागतील. एकंदरीत, मला वाटते की, गेल्या सामन्यात (मुंबई इंडियन्स) मला काहीसा फॉर्म मिळाला आहे, आशा आहे की, मी ती गती कायम ठेवू शकेन.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“माझ्यावर अतिरिक्त दबाव नाही, असे मी म्हणणार नाही. आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आमचे लीग स्टेजचे सामने अजून बाकी आहेत. आम्ही त्यापैकी २ जिंकण्यात यशस्वी झालो, तर आम्ही टेबलमध्ये टॉप-२ राहून प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने विजय मिळवत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातकडून खेळताना शुबमन गिलने शानदार फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. तसेच, ७ चौकारही मारले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील १४वे अर्धशतक होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘घमंड तर सर्वांचाच तुटतो, हा तर हार्दिक पंड्या होता’, ११ धावांवर बाद झाल्यानंतर गुजरातचा कर्णधार ट्रोल

हे माहितीये का? पाकिस्तानचे १२ खेळाडू खेळलेत आयपीएल, एकाचा हरभजन सिंगशी ३६चा आकडा

पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---