ऑस्ट्रेलिया संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. या दौऱ्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ कसून सराव करत आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतींचा वापर करताना दिसत आहेत. अशात स्टीव्ह स्मिथ याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजाचा वापर केल्याचे दिसत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे होईल. या मालिकेत उतरताना भारताच्या नजरा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर असतील. भारतात आर अश्विन (R Ashwin) हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी मोठा धोका सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे पाहुणा संघ अश्विनच्या गोलंदाजीवर तोडगा काढण्यासाठी भारताच्या फिरकी गोलंदाजाची मदत घेत आहे. हा गोलंदाज इतर कुणी नसून बडोदा संघाचा फिरकी गोलंदाज महेश पिथिया हा आहे. त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज नेट्समध्ये सराव करत आहेत.
How are the Aussies preparing for @ashwinravi99 ahead of their upcoming Test series with India? Well, they've only gone and flown in a near carbon copy of the star off-spinner as a net bowler | #INDvAUS pic.twitter.com/l9IPv6i43j
— cricket.com.au (@cricketcomau) February 3, 2023
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्टीव्ह स्मिथ हा नेट सेशनमध्ये महेश पिथियाच्या गोलंदाजीचा सामना करताना दिसत आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजही चांगलीच तयारी करत आहेत.
Mahesh Pithiya grew up being called “Ashwin” owing to his uncanny impersonation of his idol @ashwinravi99 & he ended up ‘playing’ Ashwin for Australia in their first training session on tour & making a big impression on Steve Smith. Here’s how #IndvAus https://t.co/GnAd63DFN6 pic.twitter.com/BgNwOWGDC6
— Bharat Sundaresan (@beastieboy07) February 3, 2023
ऑस्ट्रेलियाचा नेट बॉलर महेश पिथिया
ऑस्ट्रेलियाने नेट बॉलर म्हणून घेतलेल्या महेश पिथिया (Mahesh Pithiya) याच्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियन संघाने महेशला त्यांचा नेट बॉलर म्हणून ताफ्यात घेतले आहे. यामागील कारण आहे, महेश हा हुबेहूब अश्विन याच्यासारखी गोलंदाजी करतो. त्याची ऍक्शनदेखील अश्विनशी मिळती-जुळती आहे. महेशने मागील वर्षी बडोदाकडून घरगुती क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांसाठी सर्वात मोठे आव्हान स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला रोखण्याचे असेल. मागील काही महिन्यांमध्ये स्मिथ धावांचा पाऊस पाडत आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत चालू हंगामातही त्याने जबरदस्त फलंदाजी करत धावा कुटल्या आहेत. आता आगामी कसोटीत स्मिथला रोखण्यात भारत यशस्वी होतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer steve smith practiced mahesh pithiya bowling whos a quite similar bowler like ravichandran ashwin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत आणि पाकिस्तान संघ ‘या’ दिवशी येणार आमने-सामने, भारतीय क्रिकेटप्रेमींनी बातमी वाचलीच पाहिजे
गजबच! फलंदाजाला चकवत स्टंपला लागला चेंडू, तरीही पठ्ठ्या नॉटआऊट; बीबीएलमध्ये चाललंय तरी काय?






