भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू वेगवेगळ्या गटात इंग्लंडला पोहोचले आहेत. दोन वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी राहणाऱ्या दोन्ही संघात होणाऱ्या या ट्रॉफीबाबत चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो. अशात आता ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने त्याचे मत मांडले आहे.
काय म्हणाला स्मिथ?
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला वाटते की, ओव्हल मैदान फलंदाजी करण्यासाठी खूपच चांगली जागा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना स्मिथ म्हणाला की, “ओव्हल क्रिकेट खेळण्यासाठी खूपच चांगली जागा आहे. येथील आऊटफील्ड विजेसारखी वेगवान आहे. एकदा तुमची नजर बसली, तर इथे फलंदाजी करणे मजेशीर आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांच्या हिशोबाने इथे उसळी आणि वेग खूप चांगला असतो. त्यामुळे हा एक शानदार सामना होईल.
यासोबतच त्याने हेदेखील म्हटले की, इथे फिरकीला खूप मदत मिळू शकते. तो म्हणाला, “सामन्याच्या तिसऱ्या-चौथ्या दिवशी फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे आम्हाला त्याचप्रकारे परिस्थितीत मिळू शकते, जशी भारतात मिळाली होती.”
आयपीएल 2023 हंगामापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली गेली होती. भारताने ही मालिका 2-1ने खिशात घातली होती. पहिल्या दोन कसोटीत भारताने विजय मिळवला होता. यानंतर नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला होता आणि स्मिथने संघाची धुरा सांभाळली होती. यापैकी एक सामना अनिर्णित राहिला होता आणि एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. स्मिथने प्रभावी नेतृत्व केले होते आणि त्यानंतर त्याला कर्णधार बनवण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, स्मिथने अशा कोणत्याही शक्यतेला नकार दिला होता. (cricketer steve smith talk pitch at the oval pitch is good for batting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलनंतर कशी सरली मोहित शर्माची रात्र? जे काही म्हणाला, त्याने तुम्हीही व्हाल भावूक
‘तू जाऊन बिंधास्त खेळ…’, धोनीकडून फ्री हँड मिळताच पठ्ठ्याने गोलंदाजांना चोप चोप चोपले, वाचा सविस्तर