---Advertisement---

आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप, तरीही दिनेश कार्तिकची WTC फायनलमध्ये एन्ट्री, लवकरच होणार इंग्लंडला रवाना

Dinesh-Karthik
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे अनेक खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत.  आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग राहिलेले सदस्यही रवाना होणार आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हादेखील डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) समालोचन पॅनेलचा भाग असेल. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी कॉमेंट्री पॅनेलमध्ये रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, सुनील गावसकर, रवी शास्त्री, नासिर हुसेन आणि कुमार संगकारा यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आता यामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचीही एन्ट्री झाली आहे.

खरं तर, दिनेश कार्तिक सन 2021मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही समालोचन करताना दिसला होता. मात्र, त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले आणि त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. तो आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. मात्र, विश्वचषकानंतर पुन्हा कार्तिक भारताबाहेर गेला. आयपीएल 2023 हंगामातही त्याने खूपच निराश केले. त्याने 13 सामन्यात 11.67च्या सरासरीने 140 धावा केल्या. 30 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याच्या या प्रदर्शनावर चोहोबाजूंनी टीका झाली.

आता आयपीएलच्या खराब फॉर्मला मागे सोडत कार्तिक नवीन जबाबदारी निभावण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक लवकरच इंग्लंडला रवाना होईल. डब्ल्यूटीसी अंतिम सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील हा सामना रोमांचक असण्याची आशा आहे.

दिनेश कार्तिकविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 26 कसोटी, 94 वनडे आणि 60 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच, आयपीएलमध्ये त्याने 242 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 1025, वनडेत 1752 आणि टी20त 686 धावा आहेत. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याने 4516 धावा केल्या आहेत. (cricketer dinesh karthik will be part of the wtc final 2023 commentary team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारीच ना! भारताचा जखमी वाघ वेगाने होतोय बरा, पंतच्या कमबॅकवर आलं आनंदी करणारं अपडेट
WTC फायनलमध्ये टीम इंडियापुढे असेल ‘हे’ आव्हान, रहाणेचं नाव घेत गावसकरांनी स्पष्टच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---