जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणे याची निवड झाली आहे. अशात रहाणेविषयी भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने मोठे वक्तव्य केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील आणि आयपीएल 2023 स्पर्धेतील चमकदार कामगिरीचे फळ रहाणेला मिळाले आहे. रहाणे दीर्घ काळानंतर भारतीय जर्सीत दिसणार आहे. अशात आता कार्तिक म्हणाला आहे की, त्याच्यासाठी पुढील काही महिने खूपच महत्त्वाचे आहेत.
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super kings) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या मिनी लिलावात मूळ किंमतीत खरेदी केले होते. सुरुवातीला त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, जेव्हा बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला, तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. या संधीचं त्याने सोनं केलं. त्याने 10 सामन्यात जवळपास 170च्या स्ट्राईक रेटने 299 धावा केल्या आहेत. अशात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने रहाणेच्या कसोटी भविष्याविषयी आयसीसीशी चर्चा केली.
काय म्हणाला कार्तिक?
कार्तिक म्हणाला की, “मला वाटते, त्याला आपली मॅजिक पॉवर पुन्हा मिळाली आहे. तो चांगल्या लयीत आहे, तो चांगल्या आत्मविश्वासासह आला आहे. तो नेहमीच भारताबाहेर चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकीर्दीसाठी हे सहा ते आठ महिने खूपच महत्त्वाचे असणार आहेत.”
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “जेव्हा त्याने पुनरागमन केले, तेव्हा त्याने सीएसकेसाठी खूप चांगले प्रदर्शन केले. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली आहे, जो हेतू सिद्ध केला आहे, तो चांगल्या मानसिकतेने आला आहे आणि फलंदाजासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे.”
विशेष म्हणजे, फक्त रहाणेचा चांगला फॉर्मच नाही, तर श्रेयस अय्यर याची दुखापतही त्याच्यासाठी वरदान ठरली आहे. कारण, तो त्याच्या जागी खेळत होता. आता डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात रहाणे कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (dinesh karthik on ajinkya rahane said 6 to 8 months important)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
‘त्याने काय आयुष्यभर खेळावं…?’, धोनीच्या IPL निवृत्तीवर स्पष्टच बोलले कपिल देव