मैदानात चारही बाजूंना फटके मारण्याची क्षमता खूपच कमी खेळाडूंमध्ये असते. त्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव याच्या नावाचाही समावेश आहे. सूर्या मैदानावर एकापेक्षा एक असे भन्नाट शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आवडत्या शॉटमध्ये स्कूप शॉटचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 63वा सामना पार पडला. या सामन्यात सूर्याचा हाच शॉट त्याच्या विकेटचे कारण ठरला.
शेवटच्या 6 षटकात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी 63 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा क्रीझवर असतो, तेव्हा कोणतेही आव्हान कठीण नसते. मात्र, क्रीझवर येऊन त्याला फार काळ झाला नव्हता. तो 8 चेंडूत 7 धावांवर खेळत होता. 15व्या षटकात पहिल्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर यश ठाकूर (Yash Thakur) याने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. यावेळी त्याची गतीही खूप कमी होती. लेंथ चेंडूवर सूर्याने त्याचा आवडता स्कूप शॉट (Scoop Shot) खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडू फाईन लेगच्या वर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूरने चपळाई दाखवली. त्याने कमी गतीचा चेंडू टाकला, ज्याचा फायदा त्याला उचलता आला नाही. त्याने लवकर शॉट खेळला. त्यामुळे चेंडू बॅटवर येण्याऐवजी कड घेऊन ऑफ स्टंपला लागला. त्यामुळे सूर्या बाद झाला. सूर्याने यावेळी 9 चेंडूत फक्त 7 धावा केल्या.
What a photo!!!!!!!! https://t.co/5DFRLuArn9 pic.twitter.com/44LcLRFA7E
— Neroli Meadows (@Neroli_Meadows) May 16, 2023
मुंबईसाठी हा मोठा धक्का आणि लखनऊसाठी ही मोठी कामगिरी ठरली. सूर्या निराश होऊन तंबूत गेला. ही विकेट घेतल्यानंतर लखनऊ संघाने एकच जल्लोष केला. त्यांनी मुंबईच्या फलंदाजांना सतावण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून टीम डेविड आणि कॅमरून ग्रीन यांसारख्या जबरदस्त फिनिशर अजून मैदानावर खेळत होते, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर दुखापतीतून दीर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या मोहसिन खान (Mohsin Khan) याने शानदार अखेरचे षटक टाकले. त्याने अखेरच्या षटकात 11 धावांचा बचाव केला. यावेळी मोहसिनने फक्त 5 धावा खर्च केल्या. तसेच, संघाला 5 धावांनी विजय मिळवून दिला. या पराभवानंतरही मुंबई संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे. (cricketer suryakumar yadav bowled while playing scoop shot against lucknow super giants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतर रोहितचा राग उफाळला, ‘या’ खेळाडूंना ठरवले जबाबदार; लगेच वाचा
हरभजनची BCCIकडे कळकळीची विनंती, ‘या’ 2 युवा धुरंधरांना लवकरात लवकर घ्या टीम इंडियात