नव्या दमाचे युवा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत तुफान कामगिरी करत आहेत. या सर्वांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तारणहार रिंकू सिंग आणि राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने या दोन खेळाडूंना राष्ट्रीय संघात सामील करून घेण्याची मागणी केली आहे.
‘रिंकू आणि यशस्वीला मिळेल मदत’
रिंकू सिंग आणि यशस्वी जयसवाल (Rinku Singh And Yashasvi Jaiswal) हे दोन्ही खेळाडू त्यांच्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांची ही कामगिरी पाहून हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने म्हटले आहे की, “जर कुणी त्या दर्जाचे प्रदर्शन करत आहे, तर त्यांना योजनेत सामील केले पाहिजे. या दोन्ही खेळाडूंना योजना आणि संघाच्या आसपास ठेवल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यात मदत होईल, जी त्यांना आणखी चांगले बनवेल.”
रिंकू आणि यशस्वी चांगल्या फॉर्ममध्ये
हरभजनने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “रिंकू सिंग (Rinku Singh) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) हे दोघेही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या दोघांच्या फॉर्मचा अधिक फायदा घेतला पाहिजे. मी निश्चितच मान्य करेल की, जेव्हा कोणी चांगले खेळत आहे किंवा चांगली कामगिरी करत आहे, तर त्यांना योजनेचा भाग बनवले पाहिजे.”
पुढे बोलताना 42 वर्षीय हरभजन म्हणाला की, “मी हे म्हणत नाही की, त्यांना थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले पाहिजे. मात्र, त्यांना संघात घेतले पाहिजे. कारण, हे लोक खेळाडूंच्या जवळ राहिले, तर ते निश्चितच काही गोष्टी शिकतील आणि चांगले होतील. मला वाटते की, कदाचित रिंकू आणि यशस्वीसाठी खेळाडूंच्या जवळच्या गटात राहण्याची योग्य वेळ आहे. त्यांना 20 किंवा 30 पुरुष गटाचा भाग बनवा.”
‘होऊ शकतो उशीर’
“रिंकू आणि यशस्वी यांसारखे प्रतिभावान खेळाडू आधीपासूनच या स्तरावर खेळत आहेत आणि चांगले खेळत आहेत. त्यांना आताच संधी द्या नाही, तर उशीर होऊ शकतो,” असेही पुढे बोलताना हरभजन म्हणाला.
विशेष म्हणजे, रिंकू आणि यशस्वी हे आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत ऑरेंज कॅपच्या यादीत सर्वोत्तम दावेदार आहेत. यशस्वीने आतापर्यंत 13 सामन्यात 575 धावा केल्या आहेत, तर रिंकूनेही 13 सामन्यात 407 धावा केल्या आहेत. (ipl 2023 former cricketer harbhajan singh urges bcci to bring closer rinku singh and yashasvi jaiswal team india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला हरवण्यासाठी लखनऊच्या मालकाचं देवाकडे साकडं! व्हिडिओ तुफान व्हायरल
दुखापत खरी की खोटी? चाहत्यांचा कृणाल पांड्याला सवाल, पण उत्तर मिळाले अनुभवी अश्विनकडून