यावर्षी भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव भलताच फॉर्मात आहे. सूर्याने न्यूझीलंडविरुद्धही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला. त्याने रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माँगनुई येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध शतक झळकावले. सूर्याने त्याच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 शतकासाठी फक्त 51 चेंडूंची मदत घेतली. यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 11 चौकार मारले. आपल्या अफलातून फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला सूर्या या सामन्यातही आपल्या मनासारखा खेळला. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा डंका वाजत आहे. चाहते त्याच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत. सूर्याची फलंदाजी स्टाईल, षटकार-चौकार या सर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer), जो त्याच्या मजेशीर ट्वीटसाठी ओळखला जातो, त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने सूर्याला ‘थलायवा’ रजनीकांत बनवले आहे. हा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने सूर्याला टॅग करत लिहिले आहे की, “सूर्युकमारच्या सध्याच्या शानदार खेळी.” हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे 26 मिनिटांचा खेळ खराब झाला, पण या सामन्यातील एकही षटक कमी करण्यात आले नाही. सूर्याने पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीचा दम सर्वांना दाखवून दिला. सूर्याच्या या खेळीवर चाहत्यांनी ट्वीटमार्फत गौरवोद्गार काढले.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव याने त्याच्या मर्जीनुसार षटकार आणि चौकारांची बरसात केली. त्याने त्याच्या खेळीतील शेवटच्या 64 धावांसाठी फक्त 18 चेंडूंची मदत घेतली.
सूर्यकुमारला या सामन्यातील अफलातून फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड संघातील पुढील सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क येथे होणार आहे. या सामन्याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (cricketer suryakumar yadav century wasim jaffer shares funny tweets see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड, न्यूझीलंडने मिळवले फक्त ‘एवढे’ विजय
न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक; सूर्यकुमार यादवने लावली विक्रमांची रांग






